16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️ प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांना तबला वादनाने श्रद्धांजली

🔴 प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन याना प्रशांत गाजरेच्या तबला वादनाने नायगावात श्रद्धांजली. 

◼️मयुरी व सूरमयी संगीत विद्यालयाचा स्त्युत्य उपक्रम. 

शिवगर्जना न्यूज

नायगाव प्रतिनिधी

नायगाव : प्रसिद्ध तबला वादक तथा तबला नवाज भारत पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर तालवाद्य क्षेत्रात निर्माण झालेली शोक भावना व्यक्त व्हावी या करीता नायगाव येथे ताल योगी पद्मश्री पं. सुरेश तळवलकर यांचे पट शिष्य प्रसिद्ध तबला वादक प्रशांत गाजरे नांदेड यांचा उत्कृष्ट तबला वादन कार्यक्रम गुरुवारी रात्री घेण्यात आला.

कार्यक्रमा चे उद्घाटन तबला वादक प्रशांत गाजरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी संवादिनी वादक मंगेश जवळेकर परभणी, ज्येष्ठ संगीत आध्यापक बाबुराव उप्पलवार, ज्येष्ठ शाहीर दिगु तुंमवाड, ज्येष्ठ राजकारणी बाबुराव लांगडापुरे, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे, कल्याण आदी ची मंचावर उपस्थिती होती. 

शंकर बिरादार सर यांच्या मयुरी संगीत विद्यालय नायगाव बा. व नामदेव पांचाळ यांचे सूरमयी संगीत विद्यालय नरसी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी दोन्ही संगीत विद्यालयाचे विद्यार्थी यांनी सरस्वती स्तवन गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. मान्यवर याचा पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. नंतर उस्ताद झाकीर हुसेन यांना सामुहीक श्रंधांजली वाहण्यात आली. 

त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ तबला वादन या कार्यक्रमात प्रसिद्ध तबला वादक प्रशांत गाजरे यांनी तबला वादनात पंजाब घराण्याचा कायदा, पेशकार, टुकड़ा, परन, एकताल, झपताल, तीन ताल आदी तबला वाद्य प्रकार वाजवत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. व वाह उस्ताद ही आगळी वेगळी तबला वादकाची पदवी रसिकाच्या मनावर अधिराज्य करीत मिळवली. यावेळी तेवढीच उत्कृष्ट संवदिनीची लेहरासंगत साथ प्रसिद्ध हार्मोनियम वादक मंगेश जवळेकर यांनी दिली तर मंजिरीची साथ राघव जोशी यांनी प्रस्तावना व संचलन संजय देशपांडे मुगावकर यांनी केले. 

कार्यक्रमात प्रशांत गाजरे यांचे शिष्य तबला वादक वेदांत जोशी, हरिप्रसाद पांडे, व नांदेड प्रसिद्ध बासरी वादक एनुद्दीन वारसी देगलूरकर, प्रकाश सोनकांबळे, संजय देशपांडे, बाळासाहेब पाटील, गंगाधर सुगावकर, गणेश, वसंत माने, शंकर लाब्दे, माधव बैलकवाड, विजय द्रोणाचार्य, मनोज आरगुलवार, पवन, श्रीकांत चीखले नरसीकर, रामकिशन पांचाळ, या सह संगीत क्षेत्रातील जाणकार आदींची उपस्थिती होती. 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शंकर बिरादार, नामदेव पांचाळ, विश्वेश्वर जोशी, मंगेश देशपांडे, बालाजी चौधरी, ज्ञानेश्वर भतेसर, गणेश पांचाळ, ज्ञानेश्वर बैस, माधव भेदेकर, संजय शेटकर, बच्छव, आदीने परिश्रम घेतले. 

कार्यक्रमाचे संचलन माधव वाघमारे यांनी तर आभार नामदेव पांचाळ यांनी मानले.

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या