16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️स्‍वातंत्र्याचा अमृत काळात ही स्‍मशानासाठी जागा उपलब्ध नाही.

🔴 स्‍वातंत्र्याचा अमृत काळात ही कार्ला खु. गावास स्‍मशानासाठी जागा उपलब्ध नाही.

▪️स्‍मशान भुमी जागा उपलब्‍ध करून द्या अन्‍यथा जिल्हाधिकारी दालनात बेमुदत अमरण उपोषण करू.

शिवगर्जना न्यूज,

बिलोली प्रतिनिधी

बिलोली तालुक्‍यातील मौ. कार्ला खु. ता. बिलोली या गावचे पुनर्वसन १९८२-८३ च्‍या दरम्‍यान अतिवृष्‍टीने आलेल्‍या महापुरामुळे झालेले आहे. कार्ला खुर्द या गावात हिंदु, मुस्लिम, बोध्‍द धर्मीय बांधव वास्तव्‍यास आहेत. या पुनर्वसन झालेल्‍या गावात धार्मिक व सामाजिक व सार्वजनिक कुठली स्‍मशान भुमी उपलब्‍ध नाही. गावातील एखादी व्‍यक्‍ती मरण पावल्‍यास त्‍यांची अंत्‍यविधीसाठी जुन्‍या गावात पावसाळ्यात चिखल, काटे कुपाडे मधुन व, उन्‍हाळ्यामध्‍ये उणाची चटके खात ४ ते ५ कि.मी. खांद्यावरून प्रेत यात्रा घेऊन जावे लागत आहे. अशी हाल अपेष्‍टा गेली ४० वर्षापासुन सर्व समाज बांधव सहन करत आहे सदरील बाबींचा विचार करून जिल्‍हा प्रशासनाने गावातील धार्मिक किंवा सामाजिक अथवा शासकिय सार्वजनिक स्‍मशानभुमी उपलब्‍ध करून द्यावे, अशा आशयाचे निवेदन अनेक वेळा प्रशासनाला दिले असुन व आक्रोष मोर्चा उप विभागीय अधिकारी कार्यालय बिलोली येथे दि. ०९ ऑगस्‍ट २०२३ रोजी कार्ला खुर्द येथील नागरींकाडुन रिपब्‍लीकन सेनेच्‍या माध्‍यमातुन काढण्‍यात आले होते. त्‍या नंतर उपविभागीय अधिका-यांच्‍या सुचने नुसार कार्ला खु. ग्रामपंचायत तर्फे प्रस्ताव तयार करून पंचायत समीती, जि. प. नांदेड यांच्‍या मार्फत मा.जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्‍यात आला होता. पण काही कागदपत्रा अ‍भावी मा. जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत दि ०६ मार्च २०२४ रोजी त्रुटी ची पुर्तता करून योग्‍य कागदपत्रास पुन्‍हा प्रस्‍ताव सादर करा असे पत्र देण्‍यात आले होते पण संबधीत विभागाकडुन तसा प्रस्‍ताव पुन्‍हा पाठवण्‍यात आला नाही. अद्याप त्‍या गावास प्रशासना तर्फे कोणतीही उपाय योजना करण्‍यात आलेली नाही. त्‍या मुळे कार्ला खु. येथील तरूण मंडळी व सामाजीक कार्यकर्ते यांनी दि. १५ जानेवारी २०२५ रोजी मा. जिल्हाधिकारी संबीत जागा उपलब्‍ध करून देण्‍याची विनंती निवेदना द्वारे केली आहे. जागा उपलब्‍ध झाली नाही तर, २४ जानेवारी २०२५ पासुन जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमदत अमरण उपोषण करणार असल्‍याचे सदर निवेदनावर नमुद आहे.

निवेदनावर उपोषण कर्ते म्‍हणुन गंगाधर ईबीतकर (रिपब्‍लीकन सेना ता. अध्‍यक्ष), अलिम शेख, वाजीद शेख, शुभम कुडकेकर, सद्दाम शेख, मारोती कांबळे (सामाजीक कार्यकर्ता) आदींच्‍या स्वाक्षऱ्या आहेत.

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या