16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️२६ जानेवारीस होणार उदगीर जिल्ह्याची घोषणा.

🔴 २६ जानेवारीस होणार उदगीर जिल्ह्याची घोषणा. 

शिवगर्जना न्यूज, 

उदगीर प्रतिनिधी

उदगीरः सर्व उदगीर जनतेला आतुरता होती, ती वेळ जवळ आला असल्याची चाहूल मिळत आहे. राज्यात काही जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हा करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यानुसार, इतर काही नवीन जिल्ह्या सोबत लातूर व शेजारच्या नांदेड जिल्ह्याचे विभाजन करून नवीन उदगीर जिल्हा अस्तित्वात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शेजारी नांदेड जिल्ह्यातील लोहा व कंधार आणि मुखेड तालुक्यातील काही जिल्ह्यात होणार आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, देवणी व जळकोट तालुक्यांचा समावेश करण्यात येणार असून शेजारील नांदेड जिल्ह्यातील मुखेड व देगलुर तालुक्याचे विभाजन करून मुक्रमाबाद किंवा बार्हाळी हा नवीन तालुका निर्माण करून संभाव्य उदगीर जिल्ह्यात जोडला जाणार असून तशी प्रारूप तयार असल्याची माहिती येत आहे.

उदगीर जिल्हा मागच्या सरकार मध्येच होणार होता. मात्र, फडणवीसांनी त्यासाठी घेतलेली मेहनत व महत्वकांक्षी योजनेचे श्रेय इतरांच्या नावावर पडू नये यासाठी काळजी घेत सदरील निर्णय मंत्रि मंडळाने तात्पुरता हाता वेगळा केला होता. तो पुन्हा अजेंड्यावर असून त्यासाठी २६ जानेवारीचा मुहूर्त काढला असल्याचे बोलले जात आहे.

आमदार संजय बनसोडे हे आपल्या जाहीरनाम्यातील प्रथम वचन पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जिल्हा निर्मितीसाठी लागणारे सर्व कार्यालय, त्यांच्या इमारती सज्ज आहेत.

तसेच एम.एच. ५५ अशी नवी ओळख ही त्यांनी मागच्या टर्म मध्येच मिळवून दिली आहे. २६ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील संभाव्य जिल्ह्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या