16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️ शेती-पुरक लघु व्यवसायात युवकांनी उतरावे —-माधव चिंतले.

🔴 आधुनिकीकरणात शेती-पुरक लघु व्यवसायात युवकांनी उतरावे —-माधव चिंतले. 

शिवगर्जना न्यूज, 

नायगाव ता. प्रतिनीधी : परमेश्वर जाधव 

अधिराजस्वराज स्वाभिमान फार्मर प्रड्युसर कंपनी टाकळी( त.मा) च्या पुढाकाराने व कृषि विभागाच्या सहकार्याने कृषी विज्ञान केद्र संगरोळीच्या मार्गदर्शनाखाली ग्रामिण भागातील रोजगार व शेती पुरक व्यवसायाला चालना मिळावी मनुन टाकळी (त.मा.)व मुगाव मधील काही शेतमजुराना शेतकरी, शेतमजूर, कुक्कूट पालन व्यवसायला चालना मिळावी व शेतीस जोड धंदा व्हावा शेतकऱ्यांनी शेत मजुरांना पारंपारीक व्यवसायाची ओढ लागावी यातुन घर खर्चास चालना मिळावी म्हणून कोबड्यांचे किट वाटप करण्यात आले. मागील अनेक दिवसापासून अधिराजस्वराज स्वाभिमान कंपनीचे अध्यक्ष गावातील लोकांमध्येच व्यवसाय मिळावा करीता शेळी, मेंढी, कोंबडी, गाय म्हैस, भाजीपाला नविन पिकांच्या संदर्भात शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. तसेच शेती पुरक व्यवसाय करावा आणि गावे वाचवावी, शेती वाचवावी, सेंद्रीय शेतीकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे, सेंद्रिय शेती करावी. यासाठी कंपनीचे अध्यक्ष माधव चिंतले टाकळीकर यांनी पुढाकार घेऊन काम करताना दिसतात. तरी शेतकऱ्यांनी वरील बाबी कडे गांभिर्याने लक्ष देऊन ग्रामीण भागात शेती पुरक व्यवसायाची आवश्यकता लक्षात घेऊन, शेतकऱ्यांनी वाटचाल करावी असे मत माधव चिन्तले यांनी व्यक्त केले.

कृषी विज्ञान केंद्र सगरोळीच्या वतीने डॉ. निहाल यांनी कुक्कूट पालन जोपासना व यावर येणाऱ्या आजार व संगोपन विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी कृषी विभागा मार्फत अरुन पवार उपस्थित होते. व गावातील शेतकरी शेतमजुर मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

🎯 शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞

(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या