20.5 C
New York
Saturday, June 20, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या जिवीतास धोका निर्माण झाल्यास सरसकट नेत्यांना गावबंदी — राष्ट्रीय मराठा महासंघ

🔴 संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जिवीतास धोका निर्माण झाल्यास सरसकट नेत्यांना गावबंदी — राष्ट्रीय मराठा महासंघ. 

शिवगर्जना न्यूज, 

नाशिक : प्रतिनिधी

आज दिनांक २४/०९/२०२४ रोजी राष्ट्रीय मराठा महासंघाच्या वतीने मराठा समाजाला ५०% मध्ये ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे तसेच सगे सोयरे आधी सूचनेची अंमलबजावणी करावी. करीता मराठा समाजाच्या इतर प्रमुख मागण्यासाठी मराठा योद्धा श्री. मनोज (दादा) जरांगे पाटील हे मौजे आंतरवली सराटी ता. अंबड.जि. जालना येथे दिनांक १७/ ०९/ २०२४ रोजी पासून आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांचा उपोषणाचा ८ वा दिवस असून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत चालले आहे. त्यांच्या जीवीतास धोका निर्माण होऊ शकतो. करीता राज्य सरकारने या बाबत गांभीर्याने विचार करून मराठा समाजाची परिक्षा न पहाता, मराठा समाजाला त्वरित आरक्षण देऊन श्री जरांगे पाटील यांचे उपोषण तातडीने सोडवण्यात यावे अन्यथा आपल्याकडून मागण्या मान्य न झाल्यास आणि श्री मनोज (दादा) जरांगे पाटील यांच्या जिवीतास काही धोका निर्माण झाल्यास राष्ट्रीय मराठा महासंघाच्या वतीने सर्व सरसकट नेत्यांना गावबंदी करून महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल या विषयाचे निवेदन नाशिक मा. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना देण्यात आले. 

यावेळी सचिन भाऊ राऊत (जिल्हाप्रमुख) तसेच राहुल थोरात, योगेश कोकाटे, नामदेव वारुंगसे, रवी थोरात, भैय्या तळेकर, दत्तू बाडे, बालकिसन पाटील, राजभो, शरद राजभोज उपस्थितीत होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या