25 C
New York
Friday, June 12, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️ ॲड. उमाकांत आदमाने यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ जाहीर.

🔴 कवी, निवेदक, मा. अँड. उमाकांत आदमाने यांना विद्या निकेतन (vsvss) सोशल फौंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ जाहीर. 

शिवगर्जना न्यूज, 

पूणे : प्रतिनिधी

पुणे दि. २०ऑक्तोबर २०२४ रोजी कवी, लेखक, निवेदक, मा. ॲड. उमाकांत मधुकर आदमाने (नोटरी, भारत सरकार) विद्या निकेतन (vsvss) सोशल फौंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ संस्थेचे अध्यक्ष / संस्थापक मा. श्री. शशिकांत कोचळे यांनी जाहीर केला.

कवी ॲड. उमाकांत मधुकर आदमाने मूळ गाव बोरगाव काळे, जिल्हा लातूर परंतु सध्या स्थायिक पुणे येथून विविध सामाजिक, शैक्षणिक, व साहित्यिक चळवळीत सक्रीय असे कार्य सतत करत आहेत. कवी ॲड. उमाकांत मधुकर आदमाने हे सन २००९ पासून शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय, पुणे येथे वकीली व्यवसाय करीत असून सन २०२० मध्ये त्यांची भारत सरकार नोटरीपदी निवड झालेली असून नोटरी व्यवसाय सुद्धा प्रामाणिक पणे करीत आहेत, वकिली व्यवसाया बरोबरच त्यांनी लॉकडाऊन कालावधीत साहित्यिक विश्वात यशस्वी प्रवास करत या अगोदर साहित्य क्षेत्रात ९५ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलन, उदगीर, जि. लातूर येथे शांता शेळके कवी कट्टा वर आई या विषयावरील कविता मोठ्या दिमाखात सादर केली होती, ९६ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलन, वर्धा येथे प्रा. देविदास सोटे कवी कट्टा वर नुसत्या तुझ्या असण्याने, आई या विषयावरील कविता मोठ्या दिमाखात सादर केली होती, व ९७ व्या आ.भा.मराठी साहित्य संमेलन, अमळनेर, जळगाव येथे प्रेमकविता मोठ्या आनंदाने सादर केली. त्यामुळे साहित्यिक क्षेत्रात देखील आपला ठसा प्रामाणिकपणे उमटविला आहे, अनेक जिल्हास्तरीय, राजस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर काव्यसंमेलनात सहभाग घेऊन त्यांनी आपल्या कविता सादर केल्या. 

त्यांचे ध्येय हेच की जनसेवा हीच राष्ट्रसेवा समजून काम करणे, हे असून शैक्षणिक व सामजिक बांधिलकी या विचारातून अनेक गरजुवंत विध्यार्थाना शैक्षणीक साहित्य, गणवेश वाटप करून त्यांना आधार देण्याचे काम केले आहे, तसेच ते मुळचे लातूर या गावाचे असून किल्लारी येथे झालेल्या भूंकपग्रस्त कुटुंबातील मुले आणि मुलींच्या सहभागातून त्यांना आर्थिक, सामाजिक, मग ती धान्य मागून त्यांच्यापर्यंत नेऊन देण्याचे काम त्यांनी घडवून आणलेले आहे, तसेच NSS च्या माध्यमातून गाव मौजे पुणे, लातूर, सांगली, सातारा, बीड, उस्मानाबाद, नांदेड, राजस्थान, बेंगलोर येथे जाऊन दहा दिवसीय शिबिरात सहभाग घेऊन ‘पाणी संरक्षण’ “पाणी आडवा पाणी जिरवा” हा संदेश सर्व महाराष्ट्रभर पसरविण्याचे आतिशय मोलाचे काम करत आहेत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या