25 C
New York
Friday, June 12, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️खा.भास्करराव पाटील खतगावकर यांच्या हस्ते NDC ए.टी.एम. सेंटरचे उद्घाटन.

🔴 खा.भास्करराव पा. खतगावकर यांच्या अध्यक्षतेखाली उमरी येथे NDC ए.टी.एम. सेंटरचा उद्घाटन सोहळा संपन्न.

शिवगर्जना न्यूज,
प्रतीनिधी

दि. २४/०९/२०२४ आज उमरी येथे दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा उमरी च्या वतीने NDC ए.टी.एम. सेंटरचा उद्घाटन सोहळा राज्याचे माजी मंत्री, माजी खासदार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर  यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा खासदार कै.वसंतराव पाटील चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे,बदलत्या काळाप्रमाणे आधुनिकतेची कास धरून जिल्हा बँकेच्या वतीने विविध योजना राबवणार,शेतकऱ्यांनी सभासदांनी ए टी एम चा वापर करावा असे मनोगत अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर साहेब यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी बाळासाहेब पाटील रावणगावकर संचालक विजयसिंह देशमुख हाणेगावकर संचालक, शिवराम लुटे संचालक, श्याम पाटील कदम संचालक, कैलास देशमुख गोरठेकर संचालक, राजेंद्र नामदेवराव केशवे संचालक, रामचंद्र मुसळे संचालक, श्रीमती विजयाताई शिंदे संचालिका, संगीता पावडे संचालिका, गोविंदराव पाटील सिंधीकर, बाळासाहेब पाटील खतगावकर, प्रल्हाद पाटील इज्जतगावकर, एन.डी.पवार, आनंद कदम, सदाशिव पुपूलवाड, बालाजी जाधव, आनंदराव येल्लमगोडे, प्रकाश पाटील चिंचाळकर, राजू पाटील बोळसेकर,पारसमल दर्डा, बालाजी पाटील हातणीकर, सतीश देशमुख तळेगावकर,दत्ताहरी पाटील कावलगुडेकर, बाबू पाटील कुदळेकर, लक्ष्मीकांत देशमुख, विजय पाटील कदम भायेगावकर, दत्ताहरी पाटील शिंगणापूरकर, नागोराव पाटील शिंगणापूरकर, माधवराव पाटील शिंदे बोळसेकर, नानाराव पाटील शिंदे, व्यंकटराव केशगिरे,अजय कदम मुख्य कार्यकारी अधिकारी, आनंद देशमुख- शाखाधिकारी उमरी यांच्यासह सेवा सहकारीचे चेअरमन व सदस्यसह बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या