
🔴 २५ व्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत उत्तम पाटील यांना सुवर्ण पदक बहाल.
शिवगर्जना न्यूज,
नांदेड प्रतिनिधी : निळकंठ जाधव
नागपूर येथील डिस्ट्रिक्ट वेंटरन्स स्विमिंग असोसिएशन आणि हनुमान स्पोर्टस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने २५ वी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत दिनांक २१ व २२ सप्टेंबर २०२४ रोजी एन.आय.टी. स्विमिंग पूल नागपूर येथे आयोजित केलेल्या स्पर्धेत उत्तम धोंडीबा पाटील हाथणीकर यांनी सुवर्ण पदक पटकाविले. कुठलीही जिद्द मनाशी ठेवले की ती सहजपणे हाताळता येते पण सहजपणे हाताळण्यासाठी त्याचे कौशल्य आपल्या अंगी असावे लागते आणि कठोर परिश्रम केले की यशाची शिखर निश्चितच गाठता येते, म्हणून उत्तम पाटील हातनीकर यांनी २०० मीटर फ्री स्टाइल मध्ये सुवर्ण पदक बहाल झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन करीत आहेत. पोहणे हे सर्वात महत्त्वाचे व्यायाम आहे असून शरीर आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. या युगात अशी जिद्द असणारे फार कमी आहेत म्हणून उत्तम पाटील यांनी जो स्पर्धेचा मार्ग निवडला आणि त्यामध्ये यशस्वी रित्या कामगिरी बजावली म्हणून त्यांची मित्र व नातेवाईकासह सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.















