चंद्रकांत गज्जलवार यांची कार्यकारी संपादक पदी निवड.
देगलूर
देगलूर तालुक्यातील वळग येथील कै. गंगाराम ग्यानोबा गज्जलवार या शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले. चंद्रकांत गंगाराम गज्जलवार वळगकर. यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर देगलूर तालुक्यात सतत दहा वर्षापासून सर्व समाज घटकाला न्याय देत पत्रकारिता करत असून. तसेच सिंधू महाविद्यालय देगलूर येथून बी. ए.एम.सी.जे. मार्क्स कम्युनिकेशन जर्नालिझम मध्ये प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन. दैनिक युवाराज्य या पेपरचे काम करताना. सन २०२२ मध्ये युवा पत्रकारिता पुरस्कार प्राप्त केला. तसेच पुणे येथून प्रकाशित होणाऱ्या भगीरथ नामा वृत्तपत्र मध्ये मराठवाडा उपसंपादक म्हणून चांगले काम केल्यामुळे भगीरथ नामावर्तपत्राचे मुख्य संपादक दीपक गोवर्धन सगर यांनी भगीरथनामा वृत्तपत्राच्या कार्यकारी संपादक पदी निवड करून तसे नियुक्तीपत्र पत्र बहाल केले. तसेच पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या. भगीरथ नामावर्तपत्राच्या कार्यकारी संपादक पदी निवड झाल्यामुळे सर्व स्तरातून तसेच बेलदार गवंडी सगर समाजातून त्यांचे कौतुक होताना दिसत आहे. मित्रपरिवार, आई श्रीमती लक्ष्मीबाई गंगाराम गज्जलवार,भाऊ दत्तात्रय गज्जलवार, सुरेश गज्जलवार, गजानन गज्जलवार,बहिण सौ.पदमीनबाई माधव सुनपे, श्रीमती गोदावरी सगर व कुटुंबातील सर्व सदस्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या. भगीरथ नामावर्तपत्राचे मुख्य संपादक दीपक गोवर्धन सगर यांनी पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.















