9.9 C
New York
Monday, November 2, 2026

Buy now

spot_img
spot_img

शिवसेना आयोजित होऊ द्या चर्चा देगलूर तालुक्यात कार्यक्रम

शिवसेनेच्या वतीने आयोजित “होऊ द्या चर्चा” देगलूर तालुक्यात कार्यक्रम.

देगलूर :

शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून शिवसेना नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हा प्रमुख प्रमोद उर्फ बंडूभाऊ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूर तालुक्यात होऊ द्या चर्चा पंधरवाडा मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार भाजपच्या २० वर्षी पंतप्रधान मोदीनी लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्ज माफी, शेतीमालाला भाव, पीकविमा, दुष्काळी मदत, P.M. किसान सन्मान योजना, निराधार, वृद्धापकाळ आदी योजनेच्या अनुदानात वाढ, मागेल त्याला घरकुल, बेरोजगारांना रोजगार, मराठा, धनगर समाजाला आरक्षण, अच्छेदिनाचे स्वप्न, प्रत्येकांच्या १५ लाख खात्यात जमा होणार असल्याची दिशाभूल, महागाई कमी करण्याचे आश्वासन, गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल दरवाढ, अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला, झी टि.व्ही, मालक आदी उद्योग पती मित्राची कोट्यवधीची कर्ज माफी, सब का साथ सब का विकास, कालधन वापसी, भ्रष्टाचार बंद आदीसह असंख्य बोलघेवड्या पोकळ फसव्या घोषणा भांडाफोड करण्यासाठी वरील विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली देगलूर तालुक्यातील लख्खा, मुजळगा, चाकुर, बल्लूर, लोणी, खुतमापुर, कोकलगाव, रमतापुर येथे होऊ द्या चर्चा पंधरवाडा मोहीम निमित्ताने जाहीर कार्यक्रम घेण्यात आला यावेळी शिवसेना विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख मा.श्री संदीप महीदा मुंबईकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, देगलूर शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर, उपतालुकाप्रमुख पुरुषोत्तम अन्सापुरे, उपतालुकाप्रमुख तथा लोणीचे उपसरपंच मानाजी पाटील लोणे, गट प्रमुख दशरथ मोरे, वक्ता निलेश टकले पाटील, शिवसेना शहर समन्वयक विनोद सोनकांबळे, लख्खा येथील सरपंच, चेअरमन सुरेश पाटील मुंडकर, युवा सेना उपतालुकाप्रमुख अमोल जगन्नाथ पाटील मुंडकर, उपविभाग प्रमुख हाणमंत राजुरे, अल्पसंख्याक सेनेचे उपाध्यक्ष बाबा खान पठाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मारोतराव उचकलवार मुजळगा येथे मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष इंजिनिअर गजानन पाटील मुजळगेकर, दिनानाथ पाटील, सरपंच उल्लेवार , विभाग प्रमुख राजु उल्लेवार, शाखाप्रमुख राम पाटील, चाकुर येथे सरपंच राजुरे, युवा सेना उपतालुकाप्रमुख राम राजुरे, विभाग प्रमुख गंगाधर पाटील चाकूरकर आदी मान्यवरासह वरील गावातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. यावेळी प्रत्येक गावात वाजतगाजत मिरवणूका काढून सत्कार करण्यात आला.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या