*देगलुर सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालय येथे अवयव दानाची शपथ*
दि. २६/०९/२०२३: आयुष्माण भव: अभियान अंतर्गत आरोग्य हिताचे विविध उपक्रम संपूर्ण देशात संपन्न होत आहेत त्या पैकी अवयव दानातून गरजूंना पुनरजीवन मिळण्यासाठी जनजागृती साठी सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालय येथे अवयव दानाची शपथ उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ. नरेश देवणीकर यांनी प्रास्ताविक करून अवयव दान हॆ जीवन दान कसे मोलाचे आहे या बद्दल माहिती दिली व माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांच्या प्रमुख उपस्थिति मध्ये डॉ. सुनील जाधव यांनी अवयव दान शपथ सर्वांना दिली. या वेळी माननीय नायब तहसिलदार अन्गद नेटके व सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सर्वानी अवयव दानाचे महत्व कुटुंब, मित्र परिवार व सर्व सामान्य जणांना सांगून प्रेरित करण्याची शपथ घेतली.