*देगलूर महाविद्यालयात अवयवदान जनजागृती कार्यक्रम*
देगलूर: येथील अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित, देगलूर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने व केंद्र शासनाच्या आयुष्यमान भव: या महत्त्वकांक्षी अवयवदान योजनेअंतर्गत अवयव दानाचे महत्त्व व अवयवदान शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन खताळ होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून अ. व्या. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर कार्यकारणी सदस्य रवींद्र आप्पा धाडे यांची उपस्थिती होती.
यावेळी उपजिल्हा रुग्णालय, देगलूर चे डॉ. सुनील जाधव यांनी अवयव दानाचे महत्व सांगून उपस्थितांना अवयवदानाची शपथ दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा. विनोद काळे तर आभार प्रा. संग्राम पाटील यांनीमानले.
कार्यक्रमास उपप्राचार्य डाॅ.अनिल चिद्रावार महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.