17.7 C
New York
Monday, September 8, 2025

Buy now

spot_img
spot_img

*सरदार सरववई पापन्ना गौड जयंती निमित्त मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन सत्कार*

*सरदार सरवई पापन्ना गौड जयंती निमित्ताने माणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार संपन्न,‌ (राष्ट्रीय कलाल, गौड समाज युवा संघर्ष समिती आयोजित)*

नांदेड : सरदार सरवई पापन्ना गौड यांच्या ३७३ व्या जयंती निमित्ताने दि.२४ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता नांदेड शहरातील मिनी सह्याद्री विश्रामगृह येथे भव्य अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला असून त्या कार्यक्रमात कलाल गौड समाजातील आणि इतर समाजातील निस्वार्थपणे सेवा देणाऱ्या आणि काही निवडक जेष्ठ नागरिक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.तसेच गौड जन हकुला पोराटा (मुकुदेब्बा) राष्ट्रीय समिती संलग्न राष्ट्रीय कलाल गौड समाज युवा संघर्ष समती महाराष्ट्र राज्य च्या वतीने सन्मानचिन्ह,माणपत्र,मानाचा फेटा, शाल व पुष्पहार देऊन मान्यवरांना सन्मानित केला आहे. या कार्यक्रमाचे उदघाटक श्री अमरवेनी नरसा गौड राष्ट्रीय अध्यक्ष गौड जन हकुला पोरटा समिती (मुकुदेब्बा) हैदराबाद हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
श्री गंगाधर बुचागौड नंदा माजी जि.प.सदस्य यांची उपस्थिती होती.

प्रमुख पाहुणे म्हणून श्री कोंडापुरम बलराज गौड,रागूला किरणकुमार गौड (तेलंगना राज्य युवा अध्यक्ष), मोटकुरु शिवाजी गौड,बिलाल श्रीनिवास गौड, दुर्गम वेंकला गौड, बुरा राजाराम गौड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी शूरवीर, लढाऊ सरदार सरवाई पापन्ना गौड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारी भाषणे झाली. कलाल गौड समाजाचे आराध्य दैवत सरदार सरवाई पापन्ना गौड यांनी १६ व्यां १७ शतकात देशातील व समाजातील वंचित घटकसाठी काम केले, आपले आयुष्य झोकून दिले. आंध्र प्रदेश आणि तेलंगना मध्ये त्यांचे फार मोठे योगदान राहिलेले आहे. त्यांचे पहिले स्मारक निर्मल येथे असून देशभर त्यांचे एकशे पन्नास पेक्षा अधिक स्मारके आहेत. महाराष्ट्रा मध्ये त्यांचे स्मारक उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे मत राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या उद्घाटन पर भाषणात म्हणाले. यावेळी भोकरचे माजी उप नगराध्यक्ष गोविंद बाबा गौड पाटील, कोंडलवार म्हणाले. आयुष्यभर आम्ही समाजाची सेवा केली अजूनही कर, मार्गदर्शक म्हणून सोबत राहू पण तरुणांनी पुढे आले पाहिजे असे मत व्यक्त केले. माजी उपायुक्त शशी मोहन नंदा यांनी आपल्या समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणात पुढे आला पाहिजे आणि उच्च पदावर गेले तर समाज एक वेगळ्या दिशेने जाईल असल्याचे यावेळी ते बोलले, कामगार नेत्या कॉ.उज्वला पडलवार आदींनी मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्रामध्ये तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा कलाल गौड समाज मोठ्या प्रमाणात असून त्यांना संघटित करून त्यांच्यासाठी मोठा लढा उभारावा लागेल समाजातील अनेकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला आवाज बुलंद केला त्यांचा सन्मान झालाच येत्या काळात अजून अशाच पद्धतीने सत्कार सोहळे घेऊन अनेक लढवय्यांचा सुद्धा सत्कार सन्मान करण्यात येईल. त्यासाठी तरुण मंडळींनी पुढे येऊन समाजासाठी काम करण्याची गरज असल्याचे मत कॉ.उज्ज्वला पडलवार यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय नेते श्री अमरवेणी नरसा गौड व कार्यक्रमाचे अध्यक्ष गंगाधर नंदा व मान्यवरांच्या हस्ते हस्ते जेष्ठ नागरिक पुरस्कार श्री कामाजी जळोजी रायपलवार, लक्ष्मीकांत बापूराव पडलवार, बाबुराव रामा गौड,बिल्लरवार अंदबोरीकर आणि शेतकरी प्रभाकर महादा गौड बोड्डेवार आदींना देऊन सन्मानित करण्यात आले.

विशेष समाजकार्य पुरस्कार माहिती अधिकार तपास समितीचे अध्यक्ष श्री दत्तात्रय पांडुरंग अनंतवार आणि कामगार नेत्या तथा सीटू राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सेवानिवृत्त पुरस्कार श्रीमती कमलाबाई श्रीनिवास निलगिरवार, तुळशीराम किशनराव कलंबरकर, व्यकटेश गौड कालागौड सुदलवार, अंतेश्वर गंगाराम कोयलवार, बुधाजी लक्षमनराव नातेवाड, हिराचंद सायन्ना भुरेवार, गोविंद गणपतराव नातेवाड, सुधीर सायन्ना भुरेवार, शशी मोहन गंगाधर नंदा, अशोक शिवराम पडलवार, गणेश रंगनाथराव आलेवार, देविदास बाबाराव गौड, सुदाम विठलराव आलेवार, देविदास लक्षमनराव भुरेवार, विशवनाथ पंढरीनाथ तेलंग, गणपती रामलू सुद्दलवार, केशव नारायनराव तेलंग, मारोती नारायनराव कुंडलवार आदींना सन्मानित करण्यात आले. तसेच इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अवयव दान चळवळीचे मुख्य प्रवर्तक माधव अटकोरे आणि द हिंदू इंग्रजी वृत्त पत्राचे चांगला प्रेस मिळविलेले नोंदीत कार्यकर्ते तथा कामगार नेते चळवळीतील पॅन्थर कॉ. गंगाधर गायकवाड यांना देखील यावेळी सन्मानचिन्ह, माणपत्र,मानाचा फेटा, शाल व पुष्पहार देऊन सन्मानित केले.या कार्यकामात प्रमुख उपस्थिती मध्ये बालाजी गोडसे, नागनाथ पाटील, दिलीप चंदनवार, रमेश कोंडलवार, लक्ष्मीकांत सुंदरगिरवार, गणेश नंदेवार, बालाजी सुंदरगिरवार, संजू गौड सुद्दलवार, शामराव पडलवार, माणिक बुरेवार, कैलास जवादवार, भारत कन्नलवार, रामराव पाकलवार आदींजन होते.

कार्यक्रमाचे मुख्य आयोजक तथा राष्ट्रीय कलाल गौड समाज युवा समितीचे प्रदेश अध्यक्ष सुनील अनंतवार सह सर्व युवा नेतृत्वांचा विचारपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून त्यांचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे निवेदक तथा पत्रकार राम तरटे यांनी केले यावेळी त्यांचा देखील सन्मान झाला. सदरील‌ कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्षाच्या हस्ते प्रदेश कार्याध्यक्ष पदी गणेश बोलेवार, जिल्हा उपाध्यक्ष पदी अविनाश घंटलवार तर नांदेड शहर अध्यक्ष पदी अर्जुन नंदेवार यांची निवड करण्यात आली. आभार श्री बाबाराव माधवराव नंदेवार यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीते साठी समितीचे पदाधिकारी संदीप कोंडलवार,नितीन कन्नलवार,नागनाथ कुंडलवार, सुमित गोडसे,शंकर रायपलवार, मनोज अनंतवार,नागनाथ कुच्चेवार सोमेश कोंडलवार आदींनी परिश्रम घेतले.

अशी माहिती राष्ट्रीय कलाल,गौड समाज युवा संघर्ष समितीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सुनिल प्रभाकर अनंतवार यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या