17.7 C
New York
Monday, September 8, 2025

Buy now

spot_img
spot_img

*जी.प.के.प्रा. शाळा आलूर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त पारितोषिक वितरण*

*जि. प. के. प्रा. शाळा आलूर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पारितोषिक वितरण*

देगलूर: जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आलुर ता. देगलूर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून शाळेत वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात बलिदान दिलेल्या थोर हुतात्म्या बद्दल माहिती आपल्या भाषणातून दिली. या शाळेतील इयत्ता दुसरी तील विद्यार्थी विक्रम सचिन सोनटक्के हा विद्यार्थी “श्रेया” स्पर्धा परीक्षेत तालुक्यातून चौथा व राज्यातून बारावा आल्याबद्दल त्याचे शाळेच्या वतीने प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत कार्यालयातर्फे पण धनराषीचे पारितोषिक देण्यात आले. त्याचबरोबर शाळेमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त कु. ऋतुजा नागनाथ कुर्लेपवार, विक्रांत सचिन सोनटक्के, ऋतुजा प्रल्हाद मुत्येपवार यांची सुंदर अशी भाषणे झाली. यावेळी कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक सक्रिय कार्यकर्ते श्री अमृत सोपानराव पाटील, श्री सुरेश पाटील पालक, शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन सोनटक्के, श्री मठपती सर, ज्येष्ठ शिक्षक श्री करेवाड सर, श्री चामावार सर, श्री कडलवार सर, श्री अजगरे सर, श्री वाडेकर सर, सौ. भालके मॅडम, सौ. पाटील मॅडम, व शाळेचे सर्व विद्यार्थी व गावातील नागरिकांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या