*उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे रुग्ण कल्याण समिती ची बैठक संपन्न*
देगलूर: आज दि. २५/०९/२०२३ उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे रुग्ण कल्याण समिती ची बैठक घेण्यात आली यावेळी डॉ. नरेश देवणीकर वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय देगलूर, लक्ष्मीकांत पद्दमवार मा.नगराध्यक्ष, श्री बालाजी रोयलावार मा. उपनगराध्यक्ष, श्री एकनाथ पाटील वडगावकर कॉंग्रेस ज्येष्ठ नेते मा. नगरसेवक, डॉ.सुनील जाधव संभाजी ब्रिगेड, गिरी सा. उपअभियंता सा. बा. वि. देगलूर, श्री शिवाजी रोयलावार, श्री सुभाष कलेटवार, डॉ. विश्वनाथ मलशेटवार, डॉ. शंभू प्रसाद केंद्रे, डॉ. अश्विन पाटील, डॉ. शेख मुजीब, ई. यांची उपस्थिती होती. मीटिंग मध्ये रुग्णालयाच्या, रुग्णांच्या विविध समस्या व त्यावरील समाधान कसे करता येईल. रुग्णालय व रूग्ण हिताच्या विषयावर चर्चा करून ज्यास्तीत ज्यास्त रूग्ण सेवा, सुविधा देऊन रुग्णालयाला ज्यास्तीत ज्यास्त उच्च स्तरावर नेण्याच्या विषयावर उपाय योजना बद्द्ल मिटिंग झाली. नंतर मान्यवरांनी अगदी थोड्या काळात नव्यानेच सुरू होणार असलेल्या सी टी स्कॅन विभागाची पाहणी केली.