* लोकप्रशासनाच्या नवीन अभ्यासक्रमावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन*
देगलूर : स्वामी रामनंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून सर्व पदव्यूतर वर्गासाठी नवीन अभ्यासक्रम लागू केला आहे.
प्रस्तुत नवीन अभ्यासक्रमावर अध्यापन करणारे प्राध्यापक व अभ्यास मंडळ यांच्यत सुसंवाद व विचारमंथन होणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वा. रा. ती. म. विद्यापीठ नांदेड, अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील लोकप्रशासन विभाग व The Forum of Public Administration यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २७ सप्टेंबर २०२३रोजी एम. ए. लोकप्रशासन प्रथम वर्षाच्या नवीन अभ्यासक्रमावर विद्यापीठस्तरीय एकदिवशीय कार्यशाळा आयोजीत करण्यात आली आहे. प्रस्तुत कार्यशाळेत नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील लोकप्रशासन विषयाचे सर्व पदव्युतर प्राध्यापक व बोर्ड ऑफ स्टडीचे अध्यक्ष व सदस्य सहभागी होणार आहेत.
प्रस्तुत कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पा. बेम्बरेकर राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे सचिव शशिकांत चिद्रावार, प्राचार्य डॉ मोहन ख़ताळ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेख एम. आय., विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संतराम मुंडे व ने. सू. बोस महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागप्रमुख प्रा. अनंत कौसड़ीकर उपस्थित राहणार आहेत.
समारोप कार्यक्रम अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ मोहन ख़ताळ, प्रमुख पाहूने म्हनून बापूसाहेब पाटील एकंम्बेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंचशील एकंम्बेकर, शिवाजी महाविद्यालय कन्नडचे प्रा. डॉ. संजय भालेराव उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत साधन व्यक्ती म्हनूण विद्यापीठ लोकप्रशासन अभ्यास मंडळ सदस्य डॉ. मुक्ता सोमवंशी, डॉ. बाळासाहेब भिंगोले, डॉ. शंकर लेखने, डॉ. अमोल काळे, डॉ. चांदोबा कहाळेकर, डॉ. बी. आर. कत्तूरवार, डॉ.संजय देबडे व दयानंद महाविद्यालय लातूरचे लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ. रामेश्वर खंदारे, बोस महाविद्यालयातील प्रा. डॉ. विजय तरोडे हे मार्गदर्शन करनार आहेत तर पदव्यूतर शिक्षक यात सहभागी होणार आहेत. आयोजित कार्यशाळेत जास्तित जास्त पदव्युतर प्राध्यापकांनी सहभागी व्हावे असे अवाहन महाविद्यालयाचे ऊपप्राचार्य डॉ. ए बी चिद्रावार, कार्यशाळा समन्वयक डॉ. बी. आर. कत्तूरवार सहसमन्वयक डॉ. एस. एम. देबडे व प्रा. डी. एस. कोकने यांनी केले असून सहसमन्वयक डॉ. एस एम देबडे व प्रा. डी. एस. कोकणे यांनी केले आहे.