*भारतीय मराठा महासंघाच्या देगलूर शहराध्यक्ष पदाची निवड*
देगलूर: भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष जयदीप वरखिंडे यांनी ज्येष्ठ नागरिक कक्ष देगलूर च्या शहराध्यक्ष पदी सुधाकरराव जबडे तर मुख्य (वरीष्ठ कक्ष) देगलूर च्या शहराध्यक्ष पदी धनाजी जोशी यांची नियुक्ती देगलूर येथील शरद पवार संकुलन ज्येष्ठ नागरिक कक्ष येथे पार पाडलेल्या चर्चे वेळी नियुक्ती पत्रे देवून सत्कार करण्यात आले.
या प्रसंगी देगलूर चे विधिज्ञ ॲड. अंकुशराजे जाधव, बालाजी पाटील आंदेगावकर, नारायण पाटील उंद्रीकर, कपाळे सर, धनाजी जोशी, सुधाकरराव जबडे यांनी समयोचित भाषण करून मार्गदर्शन केले. “ज्येष्ठ नागरिक कक्ष देगलूर च्या शहराध्यक्ष पदी सुधाकरराव जबडे” यांची निवड झाल्याने ज्येष्ठाचे मार्गदर्शन लाभेल, तसेच ज्येष्ठ नागरिकाच्या समस्या सोडवण्यात हातभार लाभेल या सोबतच “मुख्य कक्षाच्या शहराध्यक्ष पदी धनाजी जोशी” यांची निवड केल्याने शहरात भारतीय मराठा महासंघाने जोमाने काम करेल अशा आशावाद चर्चेद्वारे व्यक्त करण्यात आला.
वद्येवार यांची मिल्ट्री पदी निवड झाल्याने भारतीय मराठा महासंघाकडून सत्कार करण्यात आला. तसेच सामाजिक बांधिलकी असलेले नारायण पाटील उंद्रीकर यांची मराठा मावळा जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
यावेळी *शिवगर्जना न्यूज आवाज लोकशाहीचे संपादक* श्री शहाजी वरखिंडे, श्री मैलापूरे एम. बी., श्री दत्तात्रय कपाळे सर, चिलकावार, कुर्हाडे माधव, देवकत्ते बालाजी, प्रकाशराव पवळ, कपिल कोसंबे पा., नारायण गणेशराव वडजे, ॲड. अवधूत राजकुटवार, मल्लूरवार पी.जी., संभाजी बिरादार, पांचाळ श्रावणकूमार, राचलवाड, बालाजी साहेबराव पाटील, इतर कार्यकर्त्याची उपस्थित होती.