आपण आजवर श्री गणेशाची प्रतिमा एखाद्या नोटेवर पाहिली आहे का?
(कदाचित पाहिली नसेलही)
संपादक: प्राचीन मंदिरांमध्ये गणल्या जाणाऱ्या हिंदू देवतांची अनेक भव्य आणि ऐतिहासिकदृष्ट्या मंदिरे या देशात आहेत. परंतु हा असा जगभरात एकमेव देश आहे, ज्या देशात त्यांच्या चलनी नोटांवर श्री गणेशाची प्रतिमा विराजमान आहे.*आणी हा देश आहे इंडोनेशिया.* खरं तर हा जगभरातील सर्वात मुस्लिम बहूल देश आहे. मात्र यानंतरही येथे चलनी नोटांवर श्री गणेशाची प्रतिमा दिसून येते. म्हणूनच असे असुनही नोटांवर श्री गणेशाची प्रतिमा कशी विराजमान आहे हे पाहणे रंजक ठरते.
इंडोनेशियाचे चलन भारतीय चलनाप्रमाणेच आहे. परंतु तेथेही रुपयाचे चलन चालते. इंडोनेशियात जवळपास ८७.५ % लोक इस्लाम धर्म मानतात. तेथे हिंदूंची संख्या केवळ ३ % आहे. पण तरीही तेथे २० हजारांच्या नोटेवर श्री गणेशाची प्रतिमा आहे. ही नोट इंडोनेशियन सरकारने १९९८ मध्ये चालु केली होती.
इंडोनेशियात २० हजारांच्या नोटेवर समोरील बाजूला श्री गणेशाचे छायाचित्र आहे. तर मागील बाजूला शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे छायाचित्र असून, त्यात शिक्षक व विद्यार्थी दिसून येतात. याचबरोबर इंडोनेशियाचे पहिले *शिक्षणमंत्री हजर देवांत्रा* यांचे छायाचित्रही अंतर्भूत आहे. देवांत्रा इंडोनेशियाचे स्वातंत्र्यसैनिकही राहिलेले आहेत.
श्री गणेशाला इंडोनेशियात शिक्षण, कला व विज्ञानातील देवता मानले जाते. श्री गणेशामुळेच अर्थव्यवस्था मजबूत आहे, असे त्या देशातील लोकांना वाटते. त्यामुळे या नोटेवर श्री गणेशाची प्रतिमा विराजमान आहे. सध्या ही २० हजारांची नोट चलनात नाही. मात्र याच देशात ५० हजारांची नोट चलनात आहे. आणि त्यावर बाली मंदिराचा फोटो समाविष्ट आहे.
भारतीय व चिनी संस्कृतीचे मिश्रण येथे पहायला मिळते. या देशाचा भारताशी पुरातन संबंध आहे. सुमारे पाचशे वर्षांपूर्वी हा देश एक हिंदू देश होता. परंतु नंतर त्यातले बहुसंख्य लोकांना धर्मांतराने मुसलमान करण्यात आले व हा देश मुसलमान गणला जायला लागला.
इंडोनेशियातील बाली बेटावर भगवान विष्णूंचे एक मंदिर आहे. आसपासच्या परिसरातील निसर्ग सौंदर्यामुळे या मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. समुद्रातील एक मोठ्या शिळेवर हे मंदिर आहे. १६ व्या शतकात हे मंदिर बांधण्यात आले होते. अलौकिक सौंदर्यामुळे इंडोनेशियातील पर्यटन स्थळांमध्ये या मंदिराचा पहिला क्रमांक लागतो.