मराठा मावळा संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी नारायण पाटील वडजे यांची निवड
देगलूर: मराठा मावळा संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी नारायण पाटील वडजे उंद्रीकर यांची निवड संस्थापक अध्यक्ष प्रा. माणिकराव पाटील शिंदे यांनी नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली.
नारायण पाटील यांनी केलेल्या विवीध सामाजीक कार्याची महत्त्व लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे, या निवडीमुळे मराठा मावळा संघटना तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहचण्याचा माझा मानस आहे असा विश्वास व्यक्त केला.
मराठा मावळा जिल्हाध्यक्षपदी निवडीबद्दल नांदेड जिल्ह्यातून पूढील वाटचालीस अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.