26.8 C
New York
Sunday, June 21, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️शेतकऱ्यांना अति धोकादायक स्थितीतून करावा लागतो प्रवास.

🔴 शेतकऱ्यांना अति धोकादायक स्थितीतून करावा लागतो प्रवास. 

शिवगर्जना न्यूज, 

देगलूर : तालुका प्रतिनिधी

२१ व्या शतकात ही शेतकऱ्यांना हलाखीच्या परिस्थितीत जगावे लागणे ही भारतासाठी यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती असावी? देशाचा पोशिंदा व अन्नदाता आपल्या शेती पर्यंत नीट चालत ही जाऊ शकत नसेल तर यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते असावे. देगलुर तालुका व बिलोली तालुका सीमेवरून वाहणाऱ्या मन्याड नदीच्या दोन्ही बाजूला बिलोली तालुक्यातील गळेगाव व देगलूर तालुक्यातील वझरगा, तुपशेळगाव येथील शेतकऱ्यांची शेत जमीनी आहेत. शेतकऱ्यांना शेती कामे करण्यासाठी मन्याड नदीच्या पात्रातून जीव मुठीत धरून ये-जा करावे लागत असल्याने या ठिकाणी शासनाने पुलाचे बांधकाम करावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून शासनाकडे केली जात असून ती रास्त आहे. 

सविस्तर वृत्त लोहा, कंधार, मुखेड तालुक्यातून वाहत येणारी मन्याड नदी ही बिलोली व देगलूर तालुक्याच्या सीमेवरून वाहत जाऊन पुढे तेलंगणा राज्यास मिळते. मन्याड नदी ही जेंव्हा बिलोली तालुक्यातील गळेगाव शिवारात व देगलूर तालुक्यातील वझरगा, तुपशेळगाव शिवारातून वाहते तेंव्हा बिलोली तालुक्यातील गळेगाव येथील बऱ्याच शेतकऱ्यांची जमीन ही मन्याड नदी पलीकडे देगलूर तालुक्यातील वझरगा, तुपशेळगाव शिवरालगत आहे. त्याच प्रमाणे देगलूर तालुक्यातील वझरगा व तुपशेळगाव येथील शेतकऱ्यांची बरीचशी शेत जमीन ही बिलोली तालुक्यातील गळेगाव शिवारात आहे. दोन्ही शिवारामध्ये मन्याड नदी पात्र असल्याने शेतकऱ्यांना त्या मन्याड नदीपात्रातुन शेत काम करण्यासाठी जीव मुठीत धरून पाण्यातून प्रवास करावा लागतो. त्यामुळे पाण्याचा प्रवाह अचानक पणे वाढल्यास शेतकऱ्यांना आपला जीव ही गमवावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी शासनाने पुलाचे बांधकाम करून शेतकऱ्यांना ये- जा करण्यासाठी रस्ता तयार लकरून द्यावे. अशी समस्त शेतकऱ्यांकडून शासनाकडे मागणी केली जात आहे. 

🔴 देशाच्या पोशिंद्यास केवळ मार्गक्रमण करण्यासाठी पुलाची व्यवस्था करण्यात यावी. यासंबंधीचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालय वझरगा यांच्याकडून जिल्हाधिकारी नांदेड यांना नुकतेच देण्यात आले आहे.

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या