14.7 C
New York
Tuesday, May 5, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️वाल्मीक कराडचा खेळ खल्लास, मकोका अंतर्गात गुन्हा दाखल.

♦️वाल्मीक कराडचा खेळ खल्लास, मकोका अंतर्गात गुन्हा दाखल.

शिवगर्जना न्यूज, 

बिड : प्रतिनिधी

मस्साजोग बिड प्रकरणात मास्टर माईंड असल्याचा आरोप झालेल्या वाल्मिक कराडवर अद्यापही ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल झाला नाही. परंतु सी.आय.डी. कडून आज वाल्मिक कराडवर देखील मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, खंडणी प्रकरणात पोलीस कोठडी संपल्यानंतर वाल्मिक कराडला आज केज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता कराडवर मकोका लावण्यात आला आहे.

मकोको अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने आता वाल्मिक कराडला जामीन मिळण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, यापूर्वी संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे, महेश केदार आणि जयराम चाटे याच्यावर मोकोका लावला आहे. मात्र, वाल्मिक कराडवर अद्यापही खुनाचा गुन्हा दाखल नाही. दरम्यान, मकोको अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने सत्र न्यायालयाकडून जामीन दिला जात नाही. मकोका अंतर्गातील गुन्ह्यात विशेष न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज करावा लागतो. ते विशेष न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे. त्यामुळे, मकोका अंतर्गत जामिनासाठी संभाजीनगरच्या कोर्टात अर्ज करावा लागणार आहे.मकोका म्हणजे काय? आरोपीला किती शिक्षा होते?

▪️काय आहे मकोका कायदा

महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गेनाइज्ड क्राइम अ‍ॅक्ट (MCOCA) म्हणजेच मकोका कायदा संघटीत गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी १९९९ मध्ये आणला. त्यापूर्वी असलेल्या टाडा कायद्याच्या धर्तीवर मकोका हा कायदा आणला गेला. हप्ता वसुली, खंडणी वसुली, अपहरण, हत्या, सामुहिक गुन्हेगारी या विरोधात मकोका लावला जातो. संघटीत गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्ड संपवण्यासाठी हा कायदा करण्यात आला. हा कायदा लावल्यानंतर अटकपूर्व जामीन मिळत नाही.

▪️कायद्यातील तरतुदी 

मकोका कायदा एका पेक्षा जास्त आरोपी टोळी म्हणून गुन्हे करत असतील तेव्हा लावला जातो. या कायद्यात पोलिसांना १८० दिवस दोषारोप दाखल करण्यासाठी मिळतात. हा कायदा लावल्यानंतर आरोपींना सहजासहजी जामीन मिळत नाही. एका आरोपीवर दोन पेक्षा जास्त आरोपपत्र त्यापूर्वी दाखल असतील, तेव्हाच हा कायदा लावला जातो. या कायद्यातंर्गत आरोपीचा कबुली जबाब नोंदवता येतो. त्या कबुली जबाबाचा वापर इतर सहआरोपींसाठी करता येतो. मकोको कायदा फरार आरोपीवरही लावता येतो. त्याची संपत्ती जप्त करता येते. त्याची बँक खाती गोठवता येते.

▪️आरोपींना होऊ शकते जन्मठेप. 

मकोका कायदा कठोर आहे. हा कायदा लावल्यानंतर आरोपींची सहजासहजी सुटका होत नाही. यामध्ये किमान शिक्षा पाच वर्षांची व कमाल जन्मठेपेची शिक्षा आहे. गुन्हा ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडतो, त्या ठाण्याचा अंमलदार संबंधित आरोपींवर टोळीवर मकोका लावण्याचा प्रस्ताव पाठवतो. शहरी भागामध्ये अतिरिक्त पोलिस आयुक्तांकडे हा प्रस्ताव पाठवला जातो, तर ग्रामीण भागामध्ये स्पेशल आयजी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे हा प्रस्ताव पाठवला जातो. या अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर मकोका त्या-त्या प्रकरणांत लावला जातो.

एखाद्या टोळीवर मकोका लावण्यात आला तर त्याचा तपास शहरी भागात एसपी दर्जाचा अधिकारी तर ग्रामीण भागामध्ये डीवायएसपी दर्जाचा अधिकारी करतो. १८० दिवसा पर्यंतच्या पोलिसांना यामध्ये आरोपपत्र दाखल करता येते. मकोका लागल्यानंतर ६ महिन्यांपर्यंत आरोपींना जामीन मिळत नाही. विशेषतः गुन्ह्याचा तपास होत नाही तोपर्यंत जामीन दिला जात नाही. पुढे देखील आरोपींना जामीन मिळणे कठीण असते. मकोका गुन्ह्यात किमान ५ ते १० वर्षांची शिक्षा व ५ लाखांचा दंड होऊ शकतो. जास्तीत जास्त शिक्षा ही गुन्ह्याच्या स्वरुपावरुन ठरत असते. या प्रकरणी आरोपींना जन्मठेप किंवा फाशीही होऊ शकते.

⚫ भगवान बाबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी वाल्मीक कराड वरती मोक्का लागणे हा नियतीचा संकेत आहे. 

खऱ्या अर्थाने भगवान बाबांचा कोप आणि आजची संक्रात वाल्मीक वर बरसली आहे. नियती कोणालाही सोडत नाही, आणि सोडणारही नाही.

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या