
🔴 देगलूर महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाच्यावतीने
नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यावर व्याख्यानाचे आयोजन.
शिवगर्जना न्यूज,
देगलूर प्रतिनिधी
देगलूर | अडत व्यापारी शिक्षण संस्था संचालित देगलूर महाविद्यालयातील लोकप्रशासन विभाग आणि The Forum of Public Administration Professors , Administrative Officers & Scholars यांच्या M.O.U. सामंजस्य करारा अंतर्गत दि.११ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथील लोकप्रशासन विभागप्रमुख प्रा. डॉ. गौरव गोविंदराव जेवळीकर यांचे “भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये “ या विषयावर अभ्यासपूरक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रस्तुत व्याख्यान कार्यक्रमाच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ यांच्या अध्यक्षतेस्थानी संपन्न होणार असून प्रमुख पाहुणे तुळजापूरचे तहसीलदार श्री अरविंद बोळंगे, उपप्राचार्य डॉ.अनिल चिद्रावार हे उपस्थित राहणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार B. A., B. Com & B. Sc. प्रथम वर्षा द्वितीयला सत्रासाठी V.E.C . (Value Education Course) हा पेपर अनिवार्य करण्यात आला आहे. “ भारताचे संविधान ( Constitution of India ) या पेपरच्या अभ्यासक्रमास पूरक व्याख्यान कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना “भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
प्रस्तुत व्याख्यान कार्यक्रमाचा जास्तीत जास्त विद्यर्थी व जागरूक नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन लोकप्रशासन विभाप्रमुख प्रा.डॉ.बी.आर. कतुरवार व डॉ.एस. एम देबडे यांनी केले.
शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)















