
♦️स्व. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी – राष्ट्रीय मराठा महासंघ.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे नियोजन पद्धतीने अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींनी निरापराध सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली. आरोपींना स्थानिक राजकीय नेत्यांचे अभय असल्याने अशा जातीवादी राजकीय नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच संबंधित आरोपींना अभय देणाऱ्या राजकीय नेत्यांचे मोबाईल लोकेशन सीडीआर काढून योग्य ती चौकशी करून कारवाई व्हावीच. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देऊन मराठा समाजाला न्याय देण्यात यावा अन्यथा लोकशाही व प्रशासनावर जनतेचा अजिबात विश्वास राहणार नाही. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा, आणि या सर्व आरोपींना कठोर शासन होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्री पदावरून हटवण्यात यावे. अन्यथा राज्यभर राष्ट्रीय मराठा महासंघ रस्त्यावर उतरून राज्य सरकारला त्याची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही.
समाजाला घातक अशा गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्याची मागणी राष्ट्रीय मराठा महासंघ यांच्यावतीने करण्यात आली. यावेळी सचिन भाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली तसेच दिनेश जाधव (सिन्नर तालुका अध्यक्ष) यांच्या वतीने दिनांक ०६ /०१/२०२५ रोजी मा. श्री नायब तहसीलदार मुंदडा (सिन्नर) यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी तेजस गुरुळे (सिन्नर तालुका उपाध्यक्ष), संतोष वाघे( सिन्नर तालुका संघटक), ईश्वर थोरात (सरचिटणीस), सुदाम घोडे सिन्नर ता. चिटणीस ईतर कार्यकर्त्याची उपस्थिती होती.
शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)















