20.9 C
New York
Friday, April 17, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️ पाच वर्षीय बालकाचा खासगी बस खाली चिरडून मृत्यू.

🔴 पाच वर्षीय बालकाचा खासगी बस खाली चिरडून मृत्यू. 

शिवगर्जना न्यूज, 

देगलूर प्रतिनिधी

देगलूर | शालेय सहलीच्या विद्यार्थ्यांना सगरोळी येथे सोडून देगलूरकडे जाणाऱ्या देगलूर येथील राधे राधे ट्रॅव्हल्स खाली आल्याने अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलाचा चिरडून जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी १० रोजी सकाळी ७:३० वाजता नवी आबादी मेदनकल्लूर येथे घडली. चिमुरड्याचा अपघाती मृत्यू झाल्याने गावकऱ्यांनी वाहनाची तोडफोड केल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी देगलूर पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन तणाव निवळण्यासाठी प्रयत्न केले.

नवी आबादी मेदनकल्लूर येथील अंगणवाडीमध्ये शिकत असलेला ओमकार उमेश गुजलवाड वय वर्ष (५) शुक्रवारी सकाळी ७:३० वाजता घरासमोरील रस्त्याच्या पलीकडे शौचास गेले होते. ते परत घराकडे रस्ता ओलांडून येत असताना सगरोळीहून देगलूरकडे जाणारी खासगी बस क्रमांक एम. एच. ४३- एच. ३२७६ ही भरधाव वेगाने जात असताना तीनही मुले परत घराकडे जात होते. त्यावेळी दोन मुलांनी रस्ता ओलांडला तर ओमकार गुजलवाड हा खासगी बसखाली आल्याने तो जागीच ठार झाला. मयत बालकाचे आई-वडील कामानिमित्त हैदराबाद येथे वास्तव्यास होते. ओमकारचे वडील मेदनकल्लूर येथे आल्याशिवाय बालकाचा मृतदेह जागेवरून हलवू नये अशी भूमिका गावकऱ्यांनी घेऊन वाहनाची तोडफोड केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी मोठा फौज फाटा तैनात केला होता. सायंकाळी मृत देह देगलूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर तो नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. या 

या प्रकरणी माहिती समजली असता देगलूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेने मेदनकल्लूर गावावर शोककळा पसरलेली आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या