
🔴 जिल्हा बाल विकास महिला अंतर्गत हिंसाचार व जनजागृती कार्यक्रम.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी : डॉ. शाम जाधव
नाशिक आज दिनांक २३/१२/२०२४ रोजी पारिघा वेल्फेअर फाउंडेशन व जिल्हा महिला बाल विकास अंतर्गत संयुक्त विद्यामाने लिंग आधारित हिंसाचार जन जागृती कार्यक्रम परीघा वेल्फेअर फाउंडेशन, लोखंडे मळा उपनगर नाशिक. येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून करण्यात आले.
◼️विषय (१) लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा, पीडित भरपाईवर लक्ष केंद्रित करणे.
◼️विषय (२) “चांगला स्पर्श-वाईट स्पर्श ओळखणे,” निरोगी नातेसंबंधांना प्रोत्साहन देणे आणि महिला आणि मुलींच्या प्रतिष्ठेचा आदर करणे यासारख्या विषयांवर कार्यशाळा आणि परिसंवाद राबविणे.
◼️विषय (३) बालविवाह प्रतिबंध कायद्याबाबत जनजागृती सत्र.
◼️विषय (४) राष्ट्रीय पातळीवर २४ तास बालकांसाठी असलेली चाईल्ड हेल्प लाईन १०९८ याबाबत जनजागृती. करण्यात आले असून ह्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा.
परिघा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सौ. मीनाक्षी ताई शेगांवकर यांनी ह्या कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आला होता. प्रसंगी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले होते. महिलांनी नातेवाईकांनी हा विषय समजून घेऊन तो जाणून घेतला त्याप्रसंगी श्री प्रवीण विजय आहेर चाइल्ड हेल्पलाइन सुपरवायझर व श्री सचिन हरिभाऊ शिराळ पद हेल्पलाइन केस वर्क यांचेही मार्गदर्शन लाभले. बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत जन जागृती सत्र नेहमीच चालू असते ती प्रथा बंद करण्यासाठी परिघा फाउंडेशन यांचा मोठा सहभाग लाभला.
शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)















