16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️प्रशासनास न जुमानता मुस्लिम समाजाचे गायरान जमिनीवर अतिक्रमण

🔴 मुस्लीम समाजाच्या कार्यकर्त्यांनी कुंचेली ता.नायगाव येथील गट क्रं.१६६ ची गायरान जमीन विना परवानगी अतिक्रमण करून बांधकाम करीत असलेल्या जागी नायगाव तहसिलदार, गटविकास अधिकारी, सहपोलीस निरिक्षक यांनी पंचनामा करून बांधकाम थांबविण्याचे आदेश न जुमानता काम चालू आहे ते न थाबविल्यास गावातील तणावामुळे अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन जबाबदार राहिल. 

शिवगर्जना न्यूज संपादक :

शहाजी वरखिंडे

 (9923072242) 

नायगाव तालुक्यातील कुंचेली येथील मुस्लीम समाजाच्या पुढाऱ्यांनी कोणतीही परवानगी न घेता शासकीय गायरान जमिन गट क्रं.१६६ वर अतिक्रमण करून बांधकाम करीत असताना गावातील नव तरुण सामाजिक कार्यकर्ते व समस्त गावकरी मंडळी बांधकामाबाबत चौकशी केली असता मुस्लीम समाजाच्या दफण भुमीसाठी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे शासकिय जमिन गट क्रं.१६६ चे क्षेत्र ४० आर ची मागणी दि.२० डिसेंबर २०२३ रोजी केली असल्याचे व परवानगी मिळाली म्हणून सांगत असता त्याबद्दल सखोल चौकशी असता मा.तहसिलदार साहेब नायगाव यांनी अपुर्ण कागदपत्रे असल्याचे पत्र असुन पुर्तता करण्याचे पत्र दिले आहे. त्यांची पुर्तता न करता अतिक्रमण करून बांधकाम करीत असताना गावकऱ्यांनी तहसिलदार, गटविकास अधिकारी, सहपोलीस निरिक्षक रामतिर्थ, ग्रामसेवक, सरपंच, तलाठी, उपविभागीय अधिकारी बिलोली येथे अनेक निवेदन देऊन पाठपुरावा केल्यानंतर वरील अधिकारी स्थळ पंचनामा करून काम थाबविण्याचे आदेश देऊन सुद्धा प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून काम चालू आहे. तसेच या समाजाने पूर्वी दोन ठिकाणी अतिक्रमण मोक्याच्या जागी केले आहे.

आमच्या गावाच्या गुरा ढोराचा, शेळ्या, मेंढ्या, गाढव चरई करीता गायरांनचा ऊपयोग सध्या केला जात आहे. तसेच गावात अनेक समाज असुन एकाही समाजासाठी स्मशान भूमीसाठी जागा दिली नसल्यामुळे अनेक समाज शासकिय गायरान जागेवर अंत्यसंस्कार केला जात आहे. तरी जागेवर अतिक्रमण होत असेल तर ईतर समाजाचा विचार केला जावा, एका समाजालाच न देता मुक्या जनावरांचा विचार करावा व गावातील सर्व समाजाला न्याय मिळावा म्हणून प्रत्येक समाजासाठी स्मशान भूमीसाठी जागा ऊपलब्ध करून द्यावी.

गावातील विकास निधी गायरान व अतिक्रमण केलेल्या समाजासाठी बांधकाम होत असलेल्या जागी सरपंच, ग्रामसेवक यांनी कोणत्या आधारे विकास निधी खर्च केला त्यांची कसुन चौकशी स्थळी पाहणी करुन काम न करण्याचे आदेश असताना सरपंच त्या ठिकाणी काम करीत आहे. त्यांची त्वरीत दखल घेऊन संबंधितांवर योग्य ते कार्यवाही करावी. गावात होत असलेला तणाव त्वरीत शांत करून जाती जातीत सलोखा कायम राहावा म्हणून तहसीलदार, गटविकास अधिकारी, तलाठी, सहपोलीस निरिक्षक, ग्रामसेवक यांना निवेदन देऊन त्वरीत अर्जाची दखल घेऊन चौकशी करून संबंधितांस पायबंध करून होत असलेलेले बांधकाम त्वरीत बंद करावे. निवेदनाची दखल न घेतल्यास गावात जाती जातीत तणाव तेढ निर्माण झाल्यास यांची सर्व जबाबदारी शासन प्रशासन यांची राहिल. अशी वेळ गावकऱ्यांवर येऊ देऊ नये असे निवेदन, सामाजिक कार्यकर्ते नागेश मोरचोडे, ज्ञानेश्वर शिंपाळे, शिवराज भुरे, जयराज बोधणे, संतोष शिंपाळे, दत्ता बोधणे, पंढरी डाकोरे, बालाजी जाधव, श्रीनिवास बागे, बाबुराव बोयाळ, बालाजी लालवंडे, विश्वनाथ भुरे, प्रविण डाकोरे, अविनाश शिंपाळे, लक्ष्मण इंगळे, दिलीप मोरचोंडे, विजय होनराव  समस्त गावकरी मंडळी कुंचेली गावकऱ्यांनी प्रसिध्दी दिली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या