साताऱ्याच्या पुसेसावळीमध्ये सोशल मीडियाच्या पोस्टवरुन दोन गट आपापसांत भिडले. या घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला तर पंधराहून अधिकजण जखमी झाले आहेत. त्यामधल्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर काही वाहनं पेटवण्यात आली, तर प्रार्थनास्थळांचीही जाळपोळ करण्यात आली. हा तणाव निवळण्यासाठी आणि शांततेसाठी पुसेसावळी आणि आसपासच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी या प्रकरणात १०० अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.