प्रतिनिधी: हनमंत कदम
नांदेड जिल्हा कृषी अधिकारी मानणीय बराटे साहेब व तालुका कृषी अधिकारी टोणे साहेब व सर्व कृषी विभागाचे कर्मचारी व अधिकारी चैनपुर येथे चला गावाकडे या अभियानाच्या माध्यमातून मुक्कामी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांच्या सोबत गुरूदेव सेवा मंडळाचे सहकारी, व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता या महत्त्वपूर्ण विषयावर साहेबांनी संध्याकाळी भजन करुन गावकऱ्यांशी संवाद साधले व दुसऱ्या दिवशी सर्व शेतकरी बांधवांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली व शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतले. व चैनपुर जिल्हा परिषद शाळेला त्यांनी भेट देऊन शाळेत प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केले. पहाटे उठून महादेव मंदिर येथे ध्यान करुन योगासने शिकवले. अतिशय साधी राहणी एवढे मोठे अधिकारी ग्रामीण भागात येऊन शेतकऱ्यांचा घरी आहे त्या परिस्थितीत राहुन अडचणी जाणून घेतले. व चैनपुर गावकऱ्यांच्या वतीने साहेबांना सरपंच प्रदीप वाघमारे व उपसरपंच मारोतीराव हनेगावे व सर्व ग्रामपंचायत सदस्याच्या वतीने निवेदन देण्यात आले. साहेबाच्या टीमचे चैनपुर येथील सर्व व्यवस्था, जबाबदारी चैनपुरचे उपसरपंच मारोतीराव हनेगावे यांनी घेतले. जिल्हा कृषी अधिकारी बराटे साहेब व तालुका कृषी अधिकारी टोणे साहेब, सोनकांबळे साहेब, बोडके साहेब, व सहाय्यक कृषी अधिकारी भायकटे मॅडम व सर्व कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार ग्रामपंचायत कार्यालय चैनपूर येथे सरपंच, उपसरपंच व सदस्य व गावातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने करण्यात आले. कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी ग्रामीण भागात येऊन मुक्काम करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या बद्दल जनतेमध्ये आनंदाचे वातावरण असुन पंचक्रोशीत एकच चर्चेचा विषय ठरला आहे.