18.7 C
New York
Wednesday, September 10, 2025

Buy now

spot_img
spot_img

♦️ हर-हर महादेव च्या गजरात देगलूर – करडखेड पदयात्रा संपन्न.

🔴 हर-हर महादेव च्या गजरात देगलूर – करडखेड पदयात्रा संपन्न. 

▪️पदयात्रेचे १२ वे वर्ष. 

▪️पदयात्रेत चार हजार महिला-पुरुषांचा सहभाग. 

▪️महिला व मुलींच्या संरक्षणा बरोबरच सुख, शांती आणि शेतकऱ्यांसाठी घातले साकडे. 

शिवगर्जना न्यूज, 

देगलूर प्रतिनिधी : (९९२३०७२२४२) 

देगलूर : दर वर्षाप्रमाणे यावर्षी ही तालुक्यातील करडखेड येथील प्राचीन हेमाड पंथी महादेव मंदिराच्या दर्शनासाठी श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी देगलूर ते करडखेड पदयात्रा काढण्यात आली. येरगीचे सरपंच तथा संजय गांधी निराधार अध्यक्ष,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संतोष पाटील यांच्या कडून आयोजित पदयात्रेचे हे १२ वे वर्ष असून २६ ऑगस्ट रोज सोमवारी सकाळी ०८ वाजता बंडयाप्पा मठ संस्थान गांधी चौक येथून पदयात्रेचा शुभारंभ माजी आमदार सुभाष साबणे व भा.ज.पा. माजी जिल्हाध्यक्ष व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजनाने करण्यात आले.

यावेळी भा.ज.पा. जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटिल बेम्बरेकर, अशोक साखरे, नगर पा. मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, गंगाधर पाटील कारेगावकर, सेवानिवृत्त पोलीस उप अधीक्षक रमेश कांतेवार, रमेश जाधव टाकळीकर, ॲड. रवी पाटील नरंगलकर, अशोक गंदपवार, शैलेश उल्लेवार, प्रशांत दासरवाड, कैलास येसगे, डॉ.मल्लिकार्जुन रकटे, डॉ. संजय लाडके, डॉ.रवींद्र भालके, डॉ. राहुल माका, डॉ. बच्चेवार, सचिन पाटील कारेगावकर, अरुण पाटील रामपुरकर, बसवंत हालदे, वैजनाथ मिसे, विजय आमटे, मधुकर पाटील, लक्ष्मणराव मुंगडे, संभायाप्पा स्वामी,चंद्रकांत स्वामी, वैजनाथ स्वामी, विश्वनाथ माळगे, सुभाष स्वामी देगलूरकर, रणजीत पाटिल, आत्माराम पाटिल, अशोक डुकरे, संजू पांचाळ, अशोक जुबरे,घालप्पा अंबेसंगे, नागनाथ टोंपे, दत्ता पाटिल, बालाजी ताटे, व्यंकटराव थडके, शिवकुमार डाकनवाले, गंगाधर दोसलवार, संतोष आगलावे, प्रताप घाटे, सौरभ मदुरवार, आदि उपस्थित होते.

दरवर्षी हि पदयात्रा येरगी चे सरपंच तथा संजय गांधी निराधार अध्यक्ष,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येते. महिला, युवती व बालिकांवरील अत्याचार कमी व्हावेत, बळीराजाला सुखी ठेवण्यासाठी, चांगला पाऊस पडावा, दुष्काळ परिस्थिती दूर होण्यासाठी सर्व शिव भक्तांकडून पदयात्रेच्या माध्यमातून करडखेड च्या पूर्वारेश्वर महादेवाला साकडे घालण्यात आले. 

देगलूर ते करडखेड शिवमंदिर पर्यंतचा १५ कि.मी. च्या पदयात्रेत भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी संस्कृति इंग्लिश स्कुल, केतकी संगमेश्वर फार्मर प्रोडूसर कंपनी देगलूर, अशोक मजगे, कारेगाव ला शंकर पाटील व लक्ष्मण राजुरे, प्रकाश अप्पा कोटचीरकर, प्रकाश पाटील बेमरेकर कावळगाव येथे धोंडू येसगे, बल्लुर फाटा येथे आकाश बिरादार, विशाल पाटील, संगम आचेगावे, बोरगाव में बसवंत गोपछडे, किशन राजुरे डॉ. विनायक मुंडे, डॉ. कपिल एकलारे, डॉ. बालुरकर, डॉ. कस्तुरे, अनूप कोटगिरे, संतोष नारलावर, यांच्याकडून पाणी, चहा, साबुदाणा खिचडी, फळे आदींचे वाटप करण्यात आले. पदयात्रेत शिवस्तुती गायन-भजन, या बरोबर महिला भजन मंडळीचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. गुरुराज माऊली च्या नाम स्मरणात पाऊले टाकत, टाळ-मृदंगाच्या गजरात व शिव नामाच्या घोषात ही पदयात्रा बंडयाप्पा मठापासून अण्णाभाऊ साठे चौक, देगलूर महाविद्यालय, होट्टल फाटा, कारेगाव, बल्लूर फाटा, चाकू फाटा, कावळगाव, बोरगाव मार्गे करडखेड येथील पुर्वारेश्वर महादेव मंदिरात दुपारी १२:३० वाजता पोहचली. पश्चात तेथे महादेवाची आरती पदयात्रा संयोजक संतोष पाटील व सहभागी शिव भक्तांच्या वतीने करण्यात आली.

पदयात्रे मध्ये शिव भक्तांना त्रास होऊ नये यासाठी देगलूर पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. तसेच देगलूर उपजिल्हा रुग्णालयाकडून शिव भक्तां सोबत औषधी व डॉक्टर्स, नर्स यांची टीम उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच ५० युवकांच्या स्वयंसेवक टीमने पदयात्रे मध्ये सुव्यवस्था व ट्रॅफिक नियंत्रण ठेवण्यास विशेष परिश्रम केले. 

पदयात्रेत स्वच्छता राखण्यासाठी देगलूर स्वच्छते चा जागर समितीचे सूर्यकांत सुवर्णकार आणि इतर सदस्यांनी परिश्रम केले. पदयात्रा यशस्वी करण्यासाठी संयोजक संतोष पाटील, धनाजी जोशी, इरवंत कालिंगवार, गजानन भोकसखेडे, प्रभाकर कालिंगवार, ऋषिकेश येरगे, शिवकुमार पाटिल, शिवराज इबीतवार, महिला – पुरुष भजनी मंडळ आदींनी परिश्रम केले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या