🔴 रविंद्र चव्हाण यांना खासदार करणे हीच खरी श्रद्धांजली — काँग्रेस प्रवक्ता विशाल पवार यांचे प्रतिपादन.
शिवगर्जना न्यूज,
देगलुर प्रतिनीधी : (9923072242)
मागील काही दिवसा पूर्वीच नांदेड जिल्ह्याचे बलाढ्य नेते भाजपवाशी झाले असता नांदेड जिल्हा काँग्रेस हि मोडकळीस आली असताना त्यावेळी स्व.खासदार वसंतराव चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्याच्या काँग्रेस ला ‘संजीवनी’ देत पुन्हा जिवंत केले, त्यांनी त्यांच्या विजयाने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले की नांदेड जिल्हा हा काँग्रेस चा बाले किल्ला आहे. स्व. खासदार वसंतराव चव्हाण म्हणत होते की नेते गेले म्हणून काय झालं जनता काँग्रेस च्या पाठीशी आहे हे त्यांनी लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान सिद्ध करून दाखवले परंतु त्याच्या ह्या आकस्मित निधनाने संपर्ण नांदेड जिल्हा हा पोरका आहे.
साहेबांच्या जाण्याने हि पोकळी भरून निघणार नाही परंतु त्यांचा वारसा चालवण्यासाठी रविंद्र चव्हाण हे सक्षम आहे. स्व.खासदार वसंतराव चव्हाण साहेब यांचे प्रति रूप म्हणून आम्ही त्यांना साथ देणार तसेच आगामी लोकसभा पोट निवडणुकीत रविंद्र चव्हाण यांना खासदार करूनच साहेबांना खरी श्रद्धांजली देणार असे देगलूर काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते विशाल पवार यांनी माध्यमांसमोर आपले मत व्यक्त केले.