🔴 महिला सुरक्षिततेसाठी माझा सहभाग व संघर्ष करण्याचा निर्धार.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी :डॉ. शाम जाधव
नाशिक आज दिनांक २९/०८/२०२४ रोजी चैतन्य संस्था प्रेरित सारा ग्रामीण महिला स्वयं सिद्ध संघ शिंदे नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक तालुक्यात १७ गावे व ३६० गटा सोबत काम चालू आहे. संघाच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना विविध प्रकारचे ट्रेनिंग दिले जाते व अर्थ सहाय्य पण उपलब्ध करून दिले जाते.
कलकत्ता बदलापूर या सारख्या अनेक ठिकाणी स्त्रियांवर, लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाले आहे. याच प्रमाणे नाशिक मध्ये देखील ही घटना घडली असून, या गोष्टीचा निषेध म्हणून सहारा संघातील बचत गटांच्या महिलांची नाशिक द्वारका पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन रामेश्वरी मस्के सहारा संघाच्या मॅनेजर कविता करडेल डी.एम.ओ. यांनी केले होते. विशेष सहकार्य पदाधिकारी सौ. आशा जाधव, सौ. सविता माळोदे, सौ. मनीषा शेंडगे, सौ. सपना गांगुर्डे, सौ. सुलोचना शिरसाट, सौ. सुनिता जाधव, सौ. मंगल पवार, सुमित राहुल सौ. सोनाली गवळी, सौ. चंद्रकला जाधव, सौ. रुपाली भालेराव, सौ. ज्योती ताजनपुरे, सौ कविता वाजे, सौ. जयश्री जाधव या सर्व पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी सहारा संघर्षाचे कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर जन आंदोलन केले. आम्हाला लाडकी बहीण ह्या योजनेचा लाभ नको आम्हाला आमची मुली सुरक्षित हव्या आहेत आम्ही रोजंदारीवर कामाला जात असून आमच्या मुलींची सुरक्षा कशी आम्ही करणार. या सर्व बचत गटातील महिला मोठ्या संख्येने एकत्र येऊन आपले निदर्शने करीत होते. कमिटीतील काही महिला सदस्य यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांनी स्वीकारले. लवकरात लवकर आम्ही मुलींना संरक्षण देऊ न्याय मिळवून देऊ. महिला बचत गटाची एकच मागणी हरामखोर आरोपीला फाशी ची शिक्षा द्यावे. अशी मागणी महिला बचत गटातील ३६० गट महिला यांनी फलक व निदर्शने दाखवून आपला राग अनावर केला. घोषणाबाजी करून त्यांचा संतप्त राग व्यक्त करत इथेच आंदोलन समाप्त करण्यात आले.