🔴 राखी विथ खाकी आडगाव पोलिस स्टेशन.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी : डॉ. शाम जाधव
नाशिक, आडगाव आज दिनांक २६ ऑगस्ट २०२४ रोजी, आडगाव पोलिस स्टेशन येथे रक्षाबंधन निमीत्त राखी बांधून सर्व पोलिसांना औक्षण करण्यात आले, तसेच आडगाव पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री खैरनार साहेब यांचा पण शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, त्याप्रंसंगी उपस्थित सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या सोबत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आल्या तसेच बदलापूर येथील घटना बाबतीत चर्चा करून आपल्या परिसरात असं काही प्रकार घडू नये यासाठी आपण संयुक्त विद्यमाने उपक्रम हाती घेऊन काम करू या असं सांगितलं तसेच आज श्रावणमासी सोमवार निमित्ताने आलेल्या सर्व महिला भगिनींनी फराळ व फळ चहा देण्यात आला या ब्राह्मण महासंघ, कर्तव्यदक्ष फाऊंडेशन, पोलिस मित्रपरिवार वतीने सौ. कामिनी भानुवंशे, शिला चौक, हर्षा पाठे, स्वाती कुलकर्णी, अक्षता कवीश्वर, सुनिता धनतोले आदी उपस्थित होते.