22.8 C
New York
Monday, September 8, 2025

Buy now

spot_img
spot_img

♦️नांदेड लोकसभेचे विद्यमान खासदार वसंत पाटील चव्हाण यांचे दुःखद निधन.

🔴 नांदेड लोकसभेचे विद्यमान खासदार वसंत पाटील चव्हाण यांचे दुःखद निधन. 

शिवगर्जना न्यूज, 

नायगांव ग्रा. तालुका प्रतिनिधी: दिपक गजभारे

ग्रामीण भागातून राजकीय प्रवासाची सुरुवात करणारे लोकनेते मा.खासदार वसंतराव पा.चव्हाण हे नायगाव ग्रामपंचायतचे सदस्य, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष, नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य, विधान परिषदेचे सदस्य आमदार), विधानसभेचे सदस्य, (आमदार ) नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन व सद्दाला निवडून आलेले नांदेड लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार असा मोठा राजकीय प्रवास ज्यांनी अनुभव ला तसेच लोकप्रतिनिधी या पदावर राहुन जनतेची प्रामाणिक सेवा केलेले असे मा. वसंतराव पाटील चव्हाण हे एक दुर्मिळ नेते होत. आपल्या पदाचा उपयोग जन सामान्यांसाठी व गोरगरिबांसाठी त्यांनी आयुष्यभर केला. कधीही सत्तेचा उन्माद त्यांच्याकडून झाला नाही. अतिशय मवाळ मतवादी व मित भाषी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. खासदार वसंतराव चव्हाण यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळवून नांदेड जिल्ह्यातील जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहून काम करण्याचे धाडस दाखवीत खासदार वसंतराव चव्हाण यांना मोठ्या प्रमाणात जनतेने प्रतिसाद देऊन त्यांना विजय प्राप्त करून दिला आहे म्हणून या विजयामध्ये नांदेड जिल्ह्यातील तमाम मतदार जनतेचा मोठा सिंहाचा वाटा असून जिल्ह्यातील जनतेनी विकासाचा नेता व कर्तुत्वान संयमी आणि राजकीय चांदण्याचे म्हणून अशी नांदेड जिल्ह्यामध्ये ओळख निर्माण झाली. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये जनाधार मिळाला असल्याने खासदार वसंतराव चव्हाण यांनी जनतेच्या सेवेमध्ये राहून काम करत असताना नियतीने कोहिनूर हिऱ्याला हिरावून नेलं असून त्यामुळे सबंध जिल्ह्यामध्ये शोकाकुल वातावरण असल्याचे दिसून आले आहे.खासदार वसंतराव चव्हाण यांचे हैदराबाद येथे किम्स हॉस्पिटलमध्ये निधन झाले असून त्यांचे पार्थिव आज नायगाव येथे आणण्यात येणार आहे. त्यांची 

अंत्यविधी दि. :-२७/०८/२०२४ रोजी नायगाव येथे करण्यात येणार आहे, तरी या शोकाकुल वातावरणामध्ये त्यांच्या कुटुंबीयांना मोठे बळ मिळो हीच गोरगरीब व सामान्य मतदार बांधवाकडून प्रार्थना करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या