🔴 बदलापूर दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार संदर्भात नाशिक जिल्हाधिकारी यांना जाहीर निवेदन.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी : डॉ. अशोक पगारे
नाशिक आज दिनांक २६/८/२०२४ रोजी सोमवार ठीक दुपारी १२:०० नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना नाशिक येथील आपण सर्व नाशिक जिल्हा सामाजिक संस्था व संघटना सर्व पदाधिकारी व समाज सेवक यांच्या तर्फे माननीय जिल्हाधिकारी लव जिहाद व महिलांवरील होणारा अन्याय व अत्याचार संबंधित खटले तातडीने निकालात काढावे व आरोपीस तात्काळ पाच शिक्षा द्यावे असे निवेदन जाहीर निवेदन देण्यात आले. राधिका फाउंडेशन संस्था पंचवटी नाशिक अध्यक्षा डॉ चेतनाताई सेवक. डॉ संदीप काकड, डॉ. अशोक पगारे, राजनंदिनी अहिरे व डॉ. शाम जाधव, सुरेखा मैद व रोहिणी ताई वाघ कर्तव्यदक्ष फाउंडेशन म्हसरूळ नाशिक डॉ सुनील सिंह पुराण सिंह वायस (परदेशी) संस्थापक अध्यक्ष, डॉ. आरती अहिरे, सुनंदा विसपुते, सीमा पंडित, रोहिणी क्षीरसागर, संध्या काळे व राजेश कुमार क्षीरसागर पदाक्षी चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष सौ. मीनल कुलकर्णी, मनू मानसी महिला बहुउद्देशीय सेवा भावी संस्था पंचवटी कारंजा नाशिक सौ. मेघा राजे शिंपी अध्यक्ष, शिखर स्वाभिमानी बहुउद्देशीय महिला संस्था नाशिक रोड सौ. संगीता हेमंत गायकवाड संस्थापक अध्यक्ष, ग्राहक संरक्षण समिती, ग्राहक सेवा सामाजिक बहुउद्देशीय संस्था राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सौ. आशाताई पाटील, सिटी मल्टी पर्वत फाउंडेशन नाशिक रिटा अशोक पंडित अध्यक्षा, सीमा अशोक पंडित सचिव शिवाजीनगर जेल रोड नाशिक रोड, घर अंगण बहुउद्देशीय संस्था नाशिक सौ. आशा रमेश भोईर संस्थापक अध्यक्ष वनी दिंडोरी रोड नाशिक सर्व बहुद्देशीय संस्थांचे पदाधिकारी अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण राज्यभर त्याचे अत्यंत तीव्र प्रसाद उमटले आहे त्या निंदनीय घटनेची उच्च स्तरावर चौकशी होऊन त्या नराधमास फाशीचीच शिक्षा व्हावी म्हणून लहुजहान व महिला अत्याचार संबंधी कायदा शिक्षा व्हावी म्हणून निवेदन देण्यात येत आले. संपूर्ण देशामध्ये महिलांवर चिमुकल्या मुलींवर शारीरिक अत्याचारा पासून ते खून करण्यापर्यंतची मजल समाजातील नराधमाची झाली आहे. देश रक्षण कायदा असतानांही अशा प्रकारचे गुन्हे सातत्याने घडत आहेत. कलकत्ता येथे डॉक्टर वरील अत्याचार व खून, बदलापूर, सिन्नर, अकोले, चांदवड लहान मुलीवर होणारे अत्याचार लव जिहादचे प्रकरण डोळ्या समोर घुसलेले नराधम उघड पणे समाजात घृणास्पद कृत्य करत आहेत बुलढाणा, पनवेल व नाशिक उपेंद्र नगर येथे शाळकरी मुलींचा क्लासेस च्या शिक्षकांकडून झालेला विनयभंग या मध्ये जानीने लक्ष देऊन महिला सुरक्षा कायदा अंतर्गत संरक्षण हक्क मिळवून देणे हे सर्व बहुद्देशीय संस्थांचे न्याय हक्क मिळवून देण्याचे कर्तव्य होय सुरक्षिततेचे आहे काय ? तर याचे उत्तर एकच शब्दात नाही दुर्दैवाने असेच घ्यावे लागते तिच्या वाटेला खऱ्या स्वातंत्र्याचा आनंद यावा एक पाऊल पुढे तिच्या साठी महिलांच्या सुरक्षेसाठी कायद्याची अंमलबजावणी साठी तुमच्या आमच्या मुलीं साठी, बहिणी साठी हे सर्व स्तरावरील श्री पुरुषाने एकत्र येत परिवर्तनाला वेग देण्याची वेळ आली आहे.