🌑 खा. वसंतराव चव्हाण आनंतात विलीन
♦️ शासकीय इतमामात अंत्य दर्शनासाठी जनजागर उसळला .
नांदेड प्रतिनिधी : निळकंठ जाधव
नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. मंगळवारी सकाळी सव्वाबारा वाजता हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत नायगाव येथे शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. चव्हाण यांचे कनिष्ठ चिरंजीव रणजित पाटील यांनी भडाग्नी दिला. वसंतराव चव्हाण मागील ४० वर्षा पासून राजकारणात सक्रिय होते. सरपंच ते खासदारकी पर्यंत त्यांची राजकीय कारकिर्द राहिली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने लोकसभा निवडणूक हातात घेऊन वसंतराव चव्हाण यांना भरघोस मतानी निवडून दिले. तीन वेळा आमदार राहिलेले वसंतराव चव्हाण जनतेच्या आशीर्वादाने देशाच्या सर्वोच्च सभागृहात पोहचले. परंतु नियतीने त्यांना पाच वर्ष पूर्ण करू दिले नाही. १३ ऑगस्ट रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना विमानाने हैदरावाद येथील किम्स हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले होते. २६ ऑगस्ट रोजी सकाळी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली शेवटी ४ वाजून ५ मि. त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर सोमवारी दुपारी त्यांचे पार्थिव हैदराबाद येथून नायगाव येथे आणण्यात आला. नायगाव येथे त्यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील मंडळींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, काँग्रेस विरोथी पक्ष नेते बाळासाहेव थोरात, माणिकराव ठाकरे, आ. विजय वडेट्टीवार, मा. मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री आ. अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आ.धीरज विलासराव देशमुख, मा.खा.भास्करराव पा. खतगावकर, खा. अजित गोपछडे, खा. बंडू जाधव, सूर्यकांता पाटील, डी.पी. सावंत, माजी खा. प्रताप पा. चिखलीकर, आ.बालाजी कल्याणकर, माजी खा. हेमंत पाटील, माजी आ. माधवराव किन्हाळकर, माजी मंत्री रजनीताई पाटील, आ.मोहन हंबर्डे, आ.तुशार राठोड, आ. श्यामसुंदर शिंदे, आ. जितेश अंतापूरकर, आ. विक्रम काळे, माजी मंत्री कमल किशोर कदम, माजी आ. अमर राजूरकर, माजी आ.सुभाष साबणे, माजी आ. गंगाधर पटने, माजी खा. सुभाष वानखेडे, नानासाहेव जावळे, मनोहर धोंडे, माजी आ. पोकर्णा, माजी आ.हनमंतराव पा. बेटमोगरेकर, दिलीप पाटील, बाळासाहेव रावणगावकर, प्रणिताताई चिखलीकर, वी.आर.कदम, हरिहरराव भोसीकर, भगवानराव आलेगावकर, श्याम दरक,अविनाश भोसीकर, सुरेश गायकवाड, किशोर स्वामी, मंगाराणी अंबुलगेकर, एकनाथ पवार, भगवानराव देशमुख, सुनील कदम, तानाजी पवार, श्रावण भिलवंडे, वालाजी वच्चेवार, शिवराज पा.होटाळकर, संजय पा. शेळगावकर, संजयअप्पा वेळगे, संभाजी पा. भिलवंडे, रविंद्र पा. भिलवंडे, भुजंग पाटील, देवीदास राठोड, संजय कन्हाळे, भास्कर पा. भिलवंडे, यदुवन गुरु गंभीरवन महाराज कोलंबीकर, आशाताई शिंदे, दिलीप कंदकुर्ते, अब्दुल सत्तार, प्रविण साले, पप्पू कढिकर, एकनाथ मोरे, बालाजी गाढे, सौ. बोर्डीकर यांच्यासह नायगाव मतदारसंघातील अनेक राजकीय मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करीत असताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शासनाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अप्पर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, पोलीस अधीक्षक अविनाशकुमार, अति. पोलीस अधीक्षक सुरज – गुरव, महापालिका आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, भोकर उप विभागीय अधिकारी प्रविण मेगशेट्टी, धर्मावाद उप विभागीय अधिकारी स्वाती दाभाडे, बिलोलीचे उपविभागीय अधिकारी क्रांती डोंगरे, तहसीलदार धम्मप्रिया, गायकवाड, नायव तहसीलदार विजय येरावार, तलाठी विजय पा.जाधव देवराय, व जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सह विविध क्षेत्रातील मंडळी, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह मोठा जनसागर यावेळी लोटला होता.
सर्वांचे परममित्र थोरात वसंतराव चव्हाण हे आमच्या सवाचें परममित्र होते. ते आमच्या सोबत राजकारणात वरीच वर्ष झाले चांगले व एकनिष्ठ काम केले त्याचा आम्हाला अभिमान सार्थ असून ते तालुक्यातील जनतेचे कैवारी होते. त्यांची काम करण्याची पध्दत फार चांगली होती ते आपल्यातून एवढ्या लवकर निघून जातील असे कधी वाटले नाही त्यांच्या निधनाने मी एक चांगला मित्र गमावला आहे.
खा. वसंतराव चव्हाणांचे जाणे दुःखदायक पालकमंत्री महाजन खा. वसंतराव चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखदायक असून सरपंच पदापासून ते संसद सदस्या पर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. एखाद्या पक्ष संघटनेमध्ये अगदी प्राथमिक पदा पासून विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहात वावरणे तसेच खासदार पदापर्यंत एकनिष्ठेने केलेली वाटचाल लक्षवेधील असून आदरास पात्र आहे, अशी संवेदना राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. समाजकारण, राजकारण व सामाजिक जीवनामध्ये विविध पातळीवर त्यांनी आपले वेगळेपण जपले होते. नुकतेच त्यांचे संसदे मध्ये कामकाज सुरू झाले असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांचे असे मध्येच जाणे दुःखद आहे. राजकीय वाटचाल कायम चढत्या क्रमाने ठेवत त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये आपला नावलौकिक ठेवल्याचा गर्व आहे. त्यांची साधी राहणी, कार्यकत्यांमध्ये थेट मिसळणे आणि प्रत्येक कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणे कायम लक्षात राहणारे आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या कुटुंबा प्रति, मी माझ्या संवेदना व्यक्त करतो असेही ते म्हणाले… पण त्यांना काळाने हिरावले माजी मंत्री आ. अमित देशमुख यावेळी वसंतराव चव्हाण हे जनतेच्या आशीर्वादाने निवडून आले होते. पण त्यांना काळाने हिरावून नेले. नुकत्याच झालेल्या नदिड लोकसभा निवडणुकीत पक्षाने वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी दिली आणि जनतेच्या आशीर्वादाने निवडून आले व नांदेड च्या सामान्य माणसाचा आवाज देशाच्या सर्वोच्च सभागृहात पोहचला पाचा अभिमान आहे आणि एवढधातच अशी घटना घडावी आणि ते आपल्यातून निघून जातील, असे कधीच वाटले नाही. त्यांच्या जाण्यामुळे दुःखाचा डोंगर त्यांच्या कुटुंबियांवर कोसळला आहे. तसेच पक्षाचीही मोठी हानी झाली. खा. वसंतराव चव्हाणांचा पंचक्रोशीत जिव्हाळा होता. ते गोरगरिबांचे नेते म्हणून परिचित होते. त्यांच्याकडे तक्रार घेऊन आल्यास ते तात्काळ न्यायनिवाडा करीत होते, अशी त्यांची ख्याती होती. अशा महान नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत माजी मंत्री आ. अमित विलासराव देशमुख यांनी श्रद्धांजली वाहिली. व नांदेड जिल्ह्यातील लाखोच्या संख्येने नागरिक व महिला मंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.