🔴 जिल्हा स्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत देगलूर महाविद्यालयाचा संघ प्रथम.
शिवगर्जना न्यूज,
देगलूर प्रतिनिधी (९९२३०७२२४२)
देगलूर: येथील अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयाचा संघ जिल्हा स्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गोकुळ नगर नांदेड येथे दिनांक २०/०८/२०२४ रोजी झालेल्या जिल्हा स्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत देगलूर महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. महाविद्यालयाच्या टेनिस संघात रितेश वाघमारे, शुभम गायकवाड, शिवाजी टेकाळे, संदेश पाटील, कपिल शिवणगे या खेळाडूंचा समावेश होता. महाविद्यालयाच्या टेनिस संघाने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून यश प्राप्त केले. मिळालेल्या यशा बद्दल अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर, उपाध्यक्ष जनार्धन चिद्रावार, सह सचिव राजकुमार महाजन, कोषाध्यक्ष विलास तोटावार यांच्यासह संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य डॉ. कर्मवीर उनग्रतवार, देवेंद्र मोतेवार, नारायणराव मैलागिरे, सूर्यकांत नारलावार, गंगाधरराव जोशी, रविंद्र अप्पा द्याडे, चंद्रकांत नारलावार, गुरुराज चिद्रावार, विजय उनग्रतवार, सुभाषराव सांगवीकर, गोविंद प्रसाद झंवर यांच्या सह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ, उप प्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, उप प्राचार्य प्रा. उत्तम कुमार कांबळे, पर्यवेक्षक संग्राम पाटील, कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी, क्रिडा शिक्षक प्रा.वावधाने डी. पी., प्रा.निरज उपलंचवार, प्रा. हाके, सर्व प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी आभिनंदन केले आहे.