⚫ नको मेणबत्ती ⚫
शिवगर्जना न्यूज,
रानकवी जगदीप वनशिव पुणे✍️
भरते चौकात सभा
उरते चौकात फाशी
हातातली मेणबत्ती
न्यायाला मिळवू कशी
संविधान ओरडतो
सावधान करतोय
बेसावध समाजाला
आत्मकथा मांडतोय
वासनेच्या बाजारात
अब्रु नावाची संपत्ती
भावनेच्या विळख्यात
नीच गावाची श्रीमंती
महाकाय अहाकार
सुरक्षित प्रश्न पुन्हा
अहोरात्र सहकार
सतावतो तोच गुन्हा
ऐरणीवर आलाय
माणसाच्या या शोधात
निर्भया घायाळ झाली
क्रूरकर्मा विरोधात
इज्जतीच्या लक्तरात
मानवता कुठे नसे
दिसामाजी काहीतरी
अत्याचार केले असे
निशब्द झालाय भाव
न्यायासाठी धावाधाव
मेंदूचं बधीर झाला
हक्कासाठी गावोगाव
=======================
⚫काळीमा माणुसकीला⚫
शिवगर्जना न्यूज,
संगीता पाटील गडचिरोली✍️
अरे थांबा ! गिधाडांनो
चालविले तुम्ही काय रे…
नऊ महिन्यांच्या मुली पासून
तर सत्तर वर्षाचा आजी पर्यंत
कोणी नाही सोडली रे…
किती किती तुमची वासनांध वृती
अन् किती मनोविकृती भाव
ती कुणाची लेक, बहिण आहे रे
तुझ्या सारख्या भावाची बहिण
तुम्ही समजून का ? का घेत नाही राव…
अरे गिधाडांनो ! फासला रे
तुम्ही माणुसकीला काळीमा
माणूस म्हणून विसरून गेले
सर्व माणुसकीला ? अरे हैवान
जालीमा…..
अरे मुडद्यांनो ! मंदिर ना सोडले
शाळा, कॉलेज, सूनासान रस्ता
कुठेच सुरक्षित नाही स्त्री आज
अरे ! हैवान माणसा तुमच्या पायी
आज कुठेच, सुरक्षित नाही माझी भारतीय माता…..
असह्य, ऐकटी बघून
लांडगे टपलेले असतात
लचके तोडण्यास….
तिची आरडा ओरड बघून
कीव नाही येत का रे हैवाना?
वेळ प्रसंगी डोकं ठेचून जीवही घेतेस….
अरे! लिंग पिसाट हैवांनानो
फासला तुम्ही काळीमा
माणुसकीला..