🔴नायगांव विधानसभेची निवडणुक प्रा.रविंद्र चव्हाण सर्व ताकदीनिशी लढविणार.
शिवगर्जना न्यूज,
नायगांव ग्रा. तालुका प्रतिनिधी :दिपक गजभारे
आगामी विधानसभा निवडणकीचे वारे ८९, नायगांव विधासभेत जोराने वाहत आहेत भावी आमदार होण्यासाठी प्रत्येक इच्छुकांनी आपापल्यापरीने कामाला लागले आहेत, महाविकास आघाडी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने ही निवडणूक प्रा.रविंद्र पाटील चव्हाण हेच लढविणार असून. कांही राजकीय महत्वाकांक्षी लोक खा.वसंतराव चव्हाण यांचा प्रकृतीचा विषय घेऊन नायगांव मतदार संघात वेगळी चर्चा करीत असत्याचे कळते, कोणीही राजकीय व्यक्ती असो त्यांच्या प्रती अशा दूखःद प्रसंगी समाजामध्ये माणुसकीला न-शोभणारी वक्तव्य करुन टपोरी राजकारण करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही अनेक दूःख पचविण्याची शक्ती चव्हाण परिवार नायगांवकर यांचेकडे ईश्वराने अगोदरच दिली असल्याने या प्रसंगातूनही सूखरूप बाहेर येतील अशी हजारो जन समुदायाच्या प्रार्थनेतून नक्कीच बरे होतील. असा ठाम विश्वास आहे. खा.वसंतराव चव्हाण यांच्या प्रकृतीत दैनंदीन सूधारणा होत आहे. अशी माहिती युवक काँग्रेस सरचिटणीस देविदास पाटील सुगावे घुंगराळेकर, यांनी लेखी माहिती पत्रकाद्वारे दिली.
येणाऱ्या नायगांव विधानसभा मतदार संघाची निवडणूक प्रा.रविंद्र चव्हाण हे भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे उमेदवार असतील व निवडणूक लढवतील. तेव्हा सध्याच्या अडचणीच्या प्रसंगाच्या माध्यमातून राजकीय पोळी भाजू पहाणाऱ्या कावेबाज दुबळ्या प्रकाराला कॉंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता बळी पडणार नाही आणि चव्हाण परिवारावर प्रेम करणारा लाखो जन समुदाय कोणत्याही प्रसंगी यांच्या सोबत खंबीर पणे उभा राहील यात काही शंका नांही. मतदार संघातील सर्व कार्यकर्ते चव्हाण परिवारांच्या पाठीशीच आहेत असा ठाम विश्वास व्यक्त करीत.
प्रा.रविंद्र वसंतराव चव्हाण हे दि.२५ व २६ ऑगस्ट २०२४ रोजी नायगांव येथे कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी उपस्थीत रहाणार आहेत. असे खा.वसंतराव चव्हाण जनसंपर्क कार्यालय नायगांव येथून नायगांव युवक काँग्रेस सरचिटणीस देविदास पाटील सुगावे, यांनी प्रसिद्धी पत्रक देवून माहिती दिली.