17.3 C
New York
Saturday, April 11, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️सकल हिंदु समाजाच्या वतीने देगलूर बाजार पेठ कडकडीत बंद.

🔴 सकल हिंदु समाजाच्या वतीने देगलूर बाजार पेठ कडकडीत बंद.

शिवगर्जना न्यूज, 

देगलूर प्रतिनिधी

धार्मिकतेच्या आधारावर बांगलादेशात हिंदूना लक्ष करुन अत्याचार करण्यात तर येतच आहेत पण हिंदू मंदिराची मोडतोड करण्यात येत आहे. या प्रकारच्या निषेधार्थ हिंदू समाजाच्या वतीने दि. २० ऑगस्ट रोजी देगलूर बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला देगलूर शहरात व तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून निषेध नोंदवला. बांगलादेशात झालेल्या उठावा नंतर तेथे मोठ्या प्रमाणात दंगली उसळल्या असून यात जिहादी धर्माधांकडून धार्मिक हिंसाचार करण्यात येत आहे. धार्मिकते च्या आधारावर तेथील हिंदूना लक्ष्य करून त्यांचेवर अतोनात अत्याचार सुरू आहेत. इतकेच नाही तर हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड तसेच हिंदू देवी देवतांची विटबंना केली. या हिंसाचारात जिहादच्या नावा खाली हिंदू महिलांवर दिवसा ढवळ्या अत्याचार केले गेले. त्यांच्या अंगावरील कपड्यांचे देखील अतिशय घाणेरड्या स्वरूपात प्रदर्शन करीत असल्याचे लाजिरवाणे दर्शन घडले आहे. हिंदूना मारून त्यांची प्रेते भर चौकात लटकविले असल्याचे विभस्त चित्र आपणास दिसत आहे. हे प्रकार तेथील जिहादी संघटना व समुदाय घडवून आणत आहे. 

या सर्व हृदय द्रावक पाशवी हिंसाचाराचा व अत्याचाराचा निषेध करण्यासाठी व हिंदू एकतेचा संदेश देण्यासाठी दि. २० ऑगस्ट २०२४ रोजी मंगळवारी बंद ची हाक देण्यात आली होती. सकल हिंदू समाजा च्या वतीने मा. उप जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. देगलूर शहरातील प्रमुख रस्त्यानी विशाल मोर्चा काढून बांग्लादेश येथील सर्व घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या