21.3 C
New York
Thursday, September 11, 2025

Buy now

spot_img
spot_img

♦️पंचवटीत प्रेम प्रकरणातून पोलिसाच्या मुलाचा खून.

🔴 पंचवटीत प्रेमप्रकरणातून पोलिसाच्या मुलाचा खून. 

 शिवगर्जना न्यूज, 

नाशिक प्रतिनिधी : अशोक पगारे  

नाशिक पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेरी कंपाऊंड मध्ये मध्यरात्री पोलिस सेवेतुन निवृत्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान हत्येतील मारेकऱ्यांचा शोधार्थ पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे. 

पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेरी कंपाऊंड परिसरातील मराठा समाजाच्या वस्तीगृहाबाहेर गगन आकाश कोकाटे,( २८, वृंदावन नगर, म्हसरूळ) या युवकाची मंगळवार दि. २० रोजी मध्यरात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात संशयितांनी डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत बुधवार दि. २१ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास काही नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात गगन याचा मृतदेह आढळून आल्याने त्यांनी पंचवटी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक ज्योती आमने यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी पोलिसांना मयत गगन कोकाटेच्या खिशातून एक चिट्ठी मिळाली असल्याची माहिती आहे. हत्या घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि हि हत्या प्रथम दर्शनी प्रेम प्रकरणातून झाली असल्याचा संशय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी व्यक्त केला आहे. या हत्येतील मारेकऱ्यांचा शोधार्थ पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असुन, यातील अरोपींना लवकर च जेरबंद करण्यात पोलिसांना यश येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या