🔴 राखी बांधते रे भाऊराया
शिवगर्जना न्यूज,
संगीता रामटेके : पाटील गडचिरोली ✍️
नारळी पौर्णिमा आली बघ
येरे भाऊ माझ्या घरी
कोसो दुर नाहीस भाऊ
आहेस धावभर जागे वरी
पाठची मी तुझी बहिण
वाट पाहते राखी सणाले
डोळाभर पाहून घेईन तुले
ये रे भाऊ बहिणीच्या घराले
तुझं माझे रक्ताचे नाते
नाही कधीच तुटणार
पंच आरती ओवाळून
कपाळी टिळा लावणार
पाठ मांडला सजवून
राखी मनगटी बांधणार
मुखी पेढा भरवून तुला
रक्षणार्थ हात जोडणार
राखी बांधते हाताले भाऊराया
मनोमन जप करते देवाचे
सुखी ठेव माझ्या भावाला
निवारण कर सर्व रोगाचे
वेड्या बहिणीची वेडी माया
नको मला साळी चोळी
नको तुझे खाणे गोडधोड
धाऊन येजो संकटकाळी