🔴 गरजवंत शेतकऱ्यांचा अंत बघू नका, अन्यथा मी रस्त्यावर ऊतरणार —– गजानन पाटील चव्हाण.
शिवगर्जना न्यूज,
नायगांव ग्रा तालुका प्र. : दिपक घूंगराळकर
नायगांव:- दिनांक १२ व १३/०८/२०२४ रोजी, नायगाव तहसील कार्यालयात समोर गरजवंत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आमचे चळवळीचे सहकारी देविदास पाटील टेंभुर्णीकर आणि कैलास वाकरडे ते बेमुदत अमरण उपोषण करत आहेत. दिनांक.१२ व १३/०८/२०२४ रोजी उपोषण करते स्थळी भेट देऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या पाठिंबा देत असतांना नायगाव मतदार संघासह नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सरसकट तीन लाख रुपये पर्यंत कर्जमाफी व्हावी तसेच ई- पीक पाहणी पेरा हे अनुदान सरसकट मिळावं व आणि शेतकऱ्यावरती काटा माऊचर माती कट्टा बट्टी आणि पट्टी हे जाचक अटी रद्द करावं अशा विविध मागण्या जाणून घेत पाठिंबा देत अशी भावना व्यक्त करत असताना गजानन पाटील चव्हाण बोलत होते. व गजानन पाटील चव्हाण मित्र परिवार सह तसेच प्रहार संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने पाठिंबा दर्शवण्यात आला. यावेळेस आपली भूमिका मांडत असताना
उपस्थित नायगाव विधानसभा मतदार संघाचे शेतकरी पूत्र गजानन पाटील चव्हाण, श्रीराम पा.पवार, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष, शेतकरी पूत्र पांडुरंग पा. शिंदे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत पवार, गंगाधर कोतेवार, मारुती मंगरुळे, राजेश बेळगे, गोपीनाथ पूंडे, मिलिंद काकडे, साईनाथ बोईनवाड, शिवाजी पाटील, मारुती पा. कदम, किशोर महाराज, जयराम इबितवार, विविध क्षेत्रातील सामाजिक संघटनेतील सर्व पदाधिकारी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.