🔴 शेळगाव च्या अविनाश अनेराये यांना नेशनल एक्सलेन्स पुरस्कार प्रदान केंद्रीय मंत्राच्या हस्ते वितरण.
नायगांव ग्रा. तालुका प्रतिनिधी : दिपक गजभारे
आंतरराष्ट्रीय युवा दिवस भारतीय विद्यापीठ इंस्टिट्यूट ऑफ कंप्यूटर एप्लिकेशन्स एंड मॅनेजमेट पश्चिम विहार, नवी दिल्ली येथे पार पडला ऑल इंडिया यूथ फाउंडेशन या अंतर्गत नेशनल कल्चरल फेस्टिवल २०२४ सोमवारी हा सोहळा पार पडला या मधे समाजसेवा तसेच अपंग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारा युवक म्हणून शेळगाव छत्री ता. नायगाव येथील युवक अविनाश विठ्ठलराव अनेराये सहायक प्राध्यापक अमरोहा उत्तर प्रदेश याना नेशनल एक्सलेन्स अवार्ड २०२४ देवून सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री भारत सरकार मा.रामदास आठवले हे होते तसेच विद्यापीठाचे डायरेक्टर डॉ.एम.एन.हुड्डा व राष्ट्रपती युवा पुरस्कार प्राप्त डॉ.मनीष गवई तसेच यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात रामदास आठवले याना युवकांप्रती अतिशय प्रेम आहे. आंतरराष्ट्रीय युवा दिवसाची संकल्पना त्यांनीच मांडली होती अपंग व्यक्ती प्रति सेवाभाव असणाऱ्या आणि समाजसेवासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या युवकांना पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला देश सेवा आणि सामाजिक क्षेत्रात अमुलाग्र काम करणाऱ्या युवकांचे मी या निमित्ताने आभार मानतो आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.