11.2 C
New York
Wednesday, April 29, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️कृती समितीच्या प्रतिनिधींनी घेतली शरद पवार यांची भेट.

🔴 अनुसूचित क्षेत्रातील पेक्षा १७ संवर्गातील भरती कृती समितीच्या प्रतिनिधींनी घेतली शरद पवार यांची भेट.

शिवगर्जना न्यूज, 

किनवट प्र. : अनिल बंगाळे

अनुसूचित क्षेत्रातील पेसा १७ संवर्गातील भरती कृती समितीच्या प्रतिनिधींनी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे आदिवासी सेलचे राज्यप्रमुख जयवंत वानोळे आणि सहकारी उपस्थित होते. अनुसूचित जमातीच्या सरळ सेवेच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या १७ संवर्गा पैकी काही संवर्गा परीक्षा, निकाल व प्रतिक्षा यादी आदी जाहिर झाले आहे. काही पदांची कागदपत्रे पडताळणी व समुपदेशन देखील पार पडले आहे. सामान्य प्रशासन विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावल्याने या नियुक्त्या व उर्वरित संवर्गाची भरती प्रक्रिया रखडली आहे. या विरोधात कृती समीतीने आंदोलन देखील केले आहे. मुख्यमंत्री यांनी तातडीने याची दखल घेऊन या आंदोलनकर्त्यांचे म्हणणे जाणून घेण्याची गरज आहे. कृपया आपण त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा.

यावेळी उपस्थित माधवराव वैद्य पुसद, काशिनाथ कोरडे इगतपुरी, सुरेश धनवे, राजेश टारपे बुलढाणा, नंदिनी टारपे आदिवासी विकास परिषद प्रदेशाध्यक्ष महिला तथा महिला काँग्रेस प्रदेश सचिव भरत तडपाळे, सुरज आत्राम, देविदास डाखोरे यांच्यासह अनेक आदिवासी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या