11.2 C
New York
Wednesday, April 29, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️नायगाव विधानसभा मतदार संघाची दि. ०१/०७/२०२४ या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध —-उप वि. अधिकारी स्वाती दाभाडे.

♦️नायगाव विधानसभा मतदार संघाची दि. ०१/०७/२०२४ या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध —-उप वि.अधिकारी स्वाती दाभाडे.

शिवगर्जना न्यूज, 

नायगाव ता.ग्रा. प्रतिनिधी: दिपक गजभारे

मा.भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नायगाव विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी दि. ०६/०८/२०२४ रोजी सर्व ३५० मतदान केन्द्रावर प्रसिद्ध झाली आहे सदरील यादी मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

सर्व मतदार / नागरिक यांना आवाहन करण्यात येते की ज्यांना दि. ०१/०७/२०२४ व ०१/१०/२०२४ रोजी १८ वर्ष पूर्ण झाले आहेत त्यांनी नवीन मतदार नोंदणी साठी फॉर्म नंबर ६ भरावेत सदरील फॉर्म Voter helpline या app वरून ही भरता येतील तसेच बी.एल.ओ. यांचे कडे कागद पत्रे देऊन ही भरता येतील सदरील अर्जावर त्या त्या तिमाहीत निर्णय घेण्यात येईल. त्याच बरोबर या प्रारूप यादीवर दिनांक २०/०८/२०२४ पर्यंत आक्षेप व हरकती दाखल करता येतील सदरील हरकती मयत मतदार, दुबार मतदार ईत्यादी बाबतीत दाखल करता येतील, सदरील हरकती तहसिल कार्यालय नायगाव, धर्माबाद, उमरी येथे दाखल करावेत. या कार्यक्रमानुसार दिनांक २०/०८/२०२४ पर्यंत नव मतदार नोंदणी, मयत/ दुबार मतदार वगळणी, फोटो/ पत्ता/ नाव दुरूस्ती करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी

दिनांक.३०/०८/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, तरी या मोहिमेत सर्व मतदार/नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावे असे आवाहन श्रीमती स्वाती दाभाडे, मतदान नोंदणी अधिकारी, ८९ नायगाव विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी धर्माबाद यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या