13.3 C
New York
Wednesday, April 29, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान नी मा. तहसीलदार यांना दिले निवेदन.

🔴 पीक नुकसानीची तक्रार दाखल करूनही पीक विमा मिळेना ….

धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान नी तहसीलदार प्रशांत थोरात यांनी दिले निवेदन. 

शिवगर्जना न्यूज, 

उमरी प्रतिनिधी : महेश पडोळे 

शेतकऱ्यांना नैसर्गिक (Natural to farmers) आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यासाठी शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. (Pradhan Mantri Crop Insurance Scheme implemented) देशभरातील शेतकरी आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पीक विमा योजनेत सहभागी होतात. मात्र, योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या तुलनेत नुकसान भरपाई मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी असल्याचं दिसून येत आहे.

उमरी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२३ पिक विमा रक्कम मिळाली नसल्याकारणाने धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान चे उमरी तालुका अध्यक्ष मनोज पाटील गोळेगावकर व गोळेगाव येथील शेतकरी बांधवांच्या वतीने तहसील कार्यालय उमरी येथे तहसीलदार प्रशांत थोरात यांना विमा कंपनीला व कृषी विभागाला याबाबतीत विशेष लक्ष घालून पीक विमा रक्कम मिळून देण्यास भाग पाडावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित संजू पा.जाधव, गणपत पा.जाधव, लक्ष्मण कराडे, माधव बोबडे, करण शिंदे आदी बांधव आदि जनांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या