
🔴नायगाव पोलीस ठाण्यातील पोलिस नाईक विलास भोळे यांची हेड कॉन्स्टेबल पदी पदोन्नती.
शिवगर्जना न्यूज,
नायगाव ता. प्र:.दिपक गजभारे
नायगाव पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्यांस पदोन्नती मिळाली आहे. विलास भोळे यांना नुकतीच पोलीस नाईक ते हेड कॉन्स्टेबल म्हणून पदोन्नती मिळाली आहे. या बद्दल पोलिस निरीक्षक एम.एस. मुंडे, पोलिस उपनिरीक्षक एस.के.वाघमारे, पोलीस उप निरीक्षक एस.एस.बनसोडे यांनी या पोलिस कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर बॅज लावून कौतुक केले. विलास भोळे हे १८ वर्षांच्या सेवे नंतर त्यांना पोलिस नाईक ते हेड कॉन्स्टेबल या पदावर बढती मिळाली आहे.
यावेळी पोलिस कर्मचारी देगलूरकर, सरकुलवार, गंधपवार, बामणे, वाघमारे, मुसळे सह सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.















