11.2 C
New York
Wednesday, April 29, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️स्व.बळवंतराव चव्हाण यांच्या पुण्यस्मरण निम्मित पुष्पांजली कार्यक्रम संपन्न.

🔴 खा.वसंत चव्हाण, केशव पा.चव्हाण परिवाराच्या हस्ते पूजन.

शिवगर्जना न्यूज, 

नांदेड प्रतिनिधी : निळकंठ जाधव

लोकनेते कै. बळवंतरावजी पाटील चव्हाण यांच्या १७ व्या पुण्यस्मरण, निमीत्त पुष्पाजंली कार्यक्रम हनुमान मंदिर जुने गाव नायगांव (बा) येथे बुधवार दि.०७ ऑ. रोजी सकाळी १०.वा.घेण्यात आला. या निम्मित त्यांचे सर्व नातवंडं खा. वसंतराव पाटील चव्हाण. केशव पा. चव्हाण यांच्या हस्ते विधीवृत पूजन करून श्रदधांजली कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी अमरजीत केशव चव्हाण, प्रा.रवींद्र वसंत चव्हाण, पंकज हणमंत चव्हाण, गजानन सुधाकर चव्हाण, श्रीकांत श्रीनिवास चव्हाण, व सर्व नातवंडे यांच्या हस्ते समाधीचे पूजन करण्यात आले व सार्वजनिक श्रध्दाजंली वाहण्यात आली.

तसेच केशवराव बळवंतराव चव्हाण, खा. वसंत बळवंतराव चव्हाण, हणमंतराव बळवंतराव चव्हाण, सुधाकर बळवंतराव चव्हाण, आनंदराव शंकरराव चव्हाण , श्रीनिवास व्यंकटराव चव्हाण, धनजंय शंकरराव चव्हाण, विजय शंकरराव चव्हाण, श्रीधर व्यंकटराव चव्हाण, डॉ. विश्वास व्यंकटराव चव्हाण यांनी पुष्पांजली अर्पण केले.

तसेच माजी आ.हणमंत पाटील चव्हाण, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी आर कदम, चित्रपट अभिनेते एकनाथ मोरे, विठ्ठल पावडे, बळवंत पाटील बेटमोगरेकर, शिवाजी पा. पाचपिंपळीकर, प्रल्हाद पा. इज्जतगावकर, प्रकाश पा. चींचाळकर, शैलेश रापतकर, शाहीर दिगू तुमवाड, शिवाजी पाटील गोलेगावकर, हणमंत पाटील, माधव आप्पा बेळगे, सुरेश कल्याण, कांबळे सा., दिंगबर सावंत, मनुरकर, तसेच आमदार मा. मोहन हंबर्डे, श्याम दरक, नायगाव पोलीस स्टेशन पो.नी. मारोती मुंडे, मा. सचिन खिल्लारे, मरखेल पोलीस स्टेशन पी. एस. आ मगर, ज्येष्ठ पत्रकार संजीव भाऊ कुलकर्णी, लोकसत्ता उत्तम कुलकर्णी, आदींनी भेट देऊन पुष्प अर्पण केले.

या निमीत्त गावातील, व्यापारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, परिसरातील तसेच मतदार संघातील सर्व चव्हाण परिवारावर प्रेम करणारे नातेवाईक, सहकारी कार्यकर्ते, मित्र मंडळ यांनी पूष्पाजंली च्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थीती लावली होती. कार्यक्रमाचे संचलन बालाजी शिंदे यांनी तर आभार दत्ता येवते यांनी केले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या