18.2 C
New York
Thursday, November 5, 2026

Buy now

spot_img
spot_img

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कांडाळा गावात राजकीय पुढार्‍यांना बंदी

 

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कांडाळा गावात राजकिय पुढाऱ्यांना गावबंदी व इथुन पुढल्या निवडणुकीवर बहिष्कार.

नायगाव ता. प्र.
परमेश्वर जाधव

सकल मराठा समाज कांडाळा तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे चुलीत गेले नेते, चुलीत गेला पक्ष‌, मराठा आरक्षण एकच लक्ष. सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांना कांडाळा पाटी येथे फलक लावून गाव बंदी करण्यात आली आहे. तसेच सकल मराठा समाज नायगाव तालुका वतीने आरक्षण मिळेपर्यंत सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांना आजी-माजी आमदार, आजी माजी खासदार, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, आजी माजी सभापती, आजी-माजी पंचायत समिती सदस्य या सर्वांना प्रत्येक गावात येण्यासाठी गाव बंदी केली आहे. जर कोणी नेता येण्याचं धाडस केले तर काही “अनुचित प्रकार घडल्यास ते स्वतः जबाबदार असतील” आणि त्यांना आणणारे कार्यकर्ता व आपण राजकीय कार्यक्रम उद्घाटन सोहळे, वाढदिवस, व्यवसायीक उद्घघाटने ज्या ज्या ठिकाणी सामाजिक लोक व सर्व जाती-धर्माचे एकत्र येतील असे कोणत्याही ठिकाणी वरील राजकीय नेत्यांनी येऊ नये.

यावेळी फक्त अंत्यविधीचा कार्यक्रम आणि लग्नाचा कार्यक्रम हे दोनच कार्यक्रम नेत्यांना येण्यासाठी सूट राहातील. बाकी कुठल्याही कार्यक्रमांत कोणताही नेता आल्यास त्यांना सकल मराठा समाजाच्या “तीव्र रोशास सामोरे जावे लागेल” आणि अनुचित प्रकार घडल्यास “तो स्वतः नेता आणि त्यांना सोबत घेऊन येणारा कार्यकर्ता” ते जबाबदार राहतील. संपूर्ण नायगाव तालुक्याला कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती आहे कुठल्याही नेत्यांना कोणीही आणू नये
एक मराठा, एक कोटी मराठा. 🚩🚩🚩🚩

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या