*नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांचे साखळी साखळी उपोषण*
नांदेड: मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकळ मराठा समाजातील महिला दि. २९ सप्टेंबरपासून साखळी उपोषणास बसल्या आहेत.
यावेळी सहभाग डॉ. विद्या पाटील, मिनाक्षी पाटील, सुचिता जोगदंड, अरुणा जाधव, सोनाली देशमुख, अर्चना होगे, कल्पना चव्हाण, कृष्णा मंगनाळे, सुरेखा रावणगावकर, संगीता सूर्यवंशी, शैलजा पाटील, अनुराधा खारघे पाटील, सुमिता गायकवाड, संतोषी पवार, राणी दळवी, संगीता डक, सुचिता बनगाणे, सुनिता कल्याणकर, शुभलक्ष्मी सूर्यवंशी, मीरा कोरडे, ज्योती पाटील, डॉ. स्मिता कदम, कविता वानखेडे, जयश्री ढेंबरे, रुक्मिणी बासवडे यांच्यासह साखळी उपोषणास महिलांचा सहभाग आहे.















